अजिंठा व्हॅली इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेह संमेलन
सोयगाव दि. ०८ (वृत्तसेवा) सोयगाव शहरातील अजिंठा व्हॅली इंग्लिश स्कुलचे शनिवारी सायंकाळी सहा वाजता वार्षिक स्नेह संमेलन सुरु झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव, उपनिरीक्षक गणेश झलवार, प्रकल्प अधिकारी सविता सैवर, समाज सेवक संजय शहापूरकर, भास्कर पिंगालकर, डॉ. दिनकर पिंगालकर, डॉ. स्वाती पिंगालकर, संस्थेचे मुख्याध्यापक रुपाली मानकर आदींची उपस्थिती होती. यावेळी उपनिरीक्षक गणेश झलवार, संजय शहापूरकर, सविता सैवर यांच्या हस्ते स्नेह संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी मुलांना व मुलींना पालकांनी व आईंनी मोबाईल व टी. व्ही. च्या रिमोट पासून दूर ठेवण्याचे आवाहन केले. या स्नेह संमेलनात २८ विविध पथ नाट्य, नाटिका, पोवाडे व गाण्यांचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या जीवनावर आधारित पोवाडे सादर केले. यावेळी मुख्याध्यापक रुपाली मानकर, रंजना जाधव, सिमा भामरे, मिनाक्षी रोकडे, सोनाली बागुल, पूजा दामदार, प्रियंका रोकडे, शितल तेलंगरे, रुपाली गोलारे, भास्कर पिंगलकर, डी. बी. पिंगलकर, डॉ. स्वाती पिंगलकर, रुपेश बनसोडे आदींनी पुढाकार घेतला होता.



