आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

कुपोषण आढावा बैठकीत तहसीलदार मनीषा मेने – जोगदंड यांनी केल्या मार्गदर्शक सूचना.

सोयगाव दि. २५ (वृत्तसेवा) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निर्देशानुसार तहसीलदार तथा तालुकादंडाधिकारी मनीषा मेने – जोगदंड यांनी फर्दापूर येथील अंगणवाडीला भेट दिली. व कुपोषित मुलांच्या आरोग्यासाठी व पोषणासाठी मार्गदर्शक सूचना केल्या.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेल्या निर्देशानुसार तहसीलदार तथा तालुकादंडाधिकारी मनीषा मेने – जोगदंड यांनी आज दि. २५ मंगळवार रोजी सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथील अंगणवाडीस भेट दिली. यावेळी गंभीर तीव्र कुपोषण व सौम्य तीव्र कुपोषण लाभार्थी बालकांची सुधारणा विषयी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकी दरम्यान  कुपोषित मुलांच्या आरोग्य व पोषणासाठी अंगणवाडी सेविका, पालक यांनी बालकांना पोषक आहार व आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा, राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल डोके, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रियदर्शनी पवार, आरोग्य पर्यवेक्षिका श्रीमती तमखाने, आरोग्य सेवक कदम, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button