बनोटी आरोग्य केंद्रात महारक्तदान शिबीर जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य संस्थान व दत्ताजी भाले पतपेढी छ. संभाजीनगर यांच्या सयुक्ताने रक्तदान शिबीर.
सोयगाव दि. १७ (वृत्तसेवा) जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने ठीकठीकाणी महारक्तदान शिबीराचे आयोजन होत असुन त्या अनुषंगाने सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दत्ताजी भाले पतपेढी संभाजीनगर यांच्या सयुक्ताने शनिवार (दि. १७)रक्तदान शिबीर घेण्यात आले ह्या शिबिरात जवळपास २१६ जणांनी रक्तदान केले.
यावेळी जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन खरेदी विक्री संघाचे माजी सभापती नितीन बोरसे यांनी केले व रक्तदानास सुरुवात झाली यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या मोनालीताई पिता राजेंद्र राठोड सरपंच मुरलीधर पाटील,उबाठा गटाचे युवासेना तालुका प्रमुख स्वप्निल पाटील,माजी उपसरपंच सागर खैरनार आदींची उपस्थिती होती. जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थान व दत्ताजी भाले पतपेढी संभाजीनगर यांच्या सयुक्ताने बनोटी येथे महारक्तदान शिबीर घेण्यात आले असुन सकाळी आठ वाजता रक्तदानास सुरुवात झाली सकाळपासून रक्तदान करणारांची बनोटी आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान सुरु होते ह्या शिबीरात जवळपास २१६ जणांनी रक्तदान केले असुन रक्त सकंलण करण्याचे काम डॉ.रामगोपिल मालाणी,डॉ. अजित काळे, डॉ. अजिनाथ बडक, डॉ. प्रशांत चिटणीस यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थानचे सोयगाव तालुका प्रसिद्ध प्रमुख मलखान चव्हाण, तालुका सचिव गोविंद शिंदे, तालुका अध्यक्ष संतोष जोंड, माजी तालुकाध्यक्ष हेमंत नाना, किरण निकम, सुभाष श्रीरंगकाळे, संजय भोसले, कृष्णा पाटील, कौतिक मगर यांच्यासह आदी उपस्थित होते.



