आपला जिल्हा
सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथे जेष्ठ नागरिकाच्या हस्ते ध्वजारोहण..

सोयगाव दि. ३० (वृत्तसेवा) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कंकराळा ता. सोयगाव येथे दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी कंकराळा येथील सुकलाल भिला ढाकरे यांचा सन्मान करुन त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण करण्यात आल्याने ग्रामपंचायत संरपच, उपसंरपंच व सदस्य यांचे परीसरातुन कौतुक होत आहे.
सोयगाव तालुक्यातील कंकराळा ग्रामपंचायतीने अनोखा उपक्रम उपक्रम राबवून कंकराळा गावातील जेष्ठ व्यक्ती सुकलाल भिला ढाकरे (वय १०२ वर्ष) यांचा ग्रामपंचायत कार्यालय तर्फे सत्कार करण्यात आला व त्यांना ध्वजारोहण रोहण करण्याचा मान देण्यात आले. या वेळी वयोवृद्ध ढाकरे बाबांनी सांगितले की आजचा दिवस माझ्या साठी सोण्याचा आहे. माझ्याजिवणाचे सार्थक झाले. प्रत्येकाने निर्व्यसनी जिवन जगावे असा संदेश या वेळी उपस्थितांना दिला. कंकराळा ग्रामपंचायत च्या या अनोख्या उपक्रमाचा तालुक्यात कौतुकास्पद चर्चा रंगत आहे.
कंकराळा ग्रामपंचायतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने ध्वजारोहण करण्यात आला या वेळी कंकराळा गावाचे सरपंच किशोर सोनवणे, उपसरपंच तथा युवानेते कुणाल राजपुत, ग्रा. प. सदस्य शाम पाटील, गोरख पवार, रत्नाबाई ढाकरे, सुनिताबाई उबाळे, निर्मला सोनवणे, सारिकाबाई हिवराळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम साजरी करण्यात आला व सुकलाल ढाकरे यांचा ग्रामपंचायतमार्फत फुलहार देवून सत्कार करण्यात आला तसेच उपस्थीत ग्रामसेवक सत्यनारायण पुल्लेवाड, मुख्याध्यापक एस. आर. खाकरे यांनी मान्यवरांचे आभार मानले व सुत्रसंचालन शिक्षक महेश गंवादे यांनी केले.



