क्राईम

सोयगाव तालुक्याच्या दोन्ही टोकाना अवैद्य धंदे बोकाळले. अवैद्य धंदे बंद करण्यास ग्रामीण पोलीस अधिक्षक अपयशी.

अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर...

सोयगाव दि. १७ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्याच्या एका टोकाला फर्दापुर पोलिस ठाणे हद्दीतील सावळदबारा तर दुसऱ्या टोकाला सोयगाव पोलीस ठाणे हद्दीतील बनोटी हे गावे असुन तालुक्याच्या दोन्ही पोलिस ठाणे हद्दीत अवैद्य धंदे बोकाळले असुन या कडे स्थानिक पोलिसांना माहिती देऊण देखील कारवाई होत नसल्याने ग्रामीण पोलीस अधिक्षकांचीच अवैद्य धंदे चालविण्यासाठी मुक संमती असल्याची चर्चा तालुक्यातील चौका चौकात रंगत आहे.
सविस्तर वृत्त असे की, सोयगाव तालुक्यातील जागतिक स्तरावर जगप्रसिध्द असलेली अजिंठा लेणी फर्दापूर पोलीस ठाण्या अंतर्गत येते. अजिंठा लेणी ही जगप्रसिद्ध असल्याने लेणीतील शिल्पकला बघण्यासाठी व अभ्यासासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने फर्दापूर याठिकाणी येत असतात. फर्दापुर पोलीस ठाण्यांतर्गत फर्दापुर सह जामठी, सावळदबारा परिसरात मटका, जुगार, गावठी दारू, अवैधरित्या देशिदारू या सारखे अवैध धंदे राजरोसपणे सर्रास सुरू आहे. यामुळे देशी, विदेशी पर्यटकांसह स्थानिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सोयगाव पोलीस ठाणे हद्दीतील बनोटी, गोंदेगाव, वरठाण, तिडका, कवली, बहुलखेडा, निंबायती मटका, जुगार, गावठी दारू, देशीदारू मोठ्या प्रमाणावर अवैद्य स्वरुपात सुरू आहे. अवैद्य धंद्यांमुळे तरुणवर्ग व्यसनाधीनतेकडे वळल्याने तालुक्यातील अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. फर्दापुर पोलीस ठाण्यांतर्गत फर्दापुर येथील गावाच्या बाहेर नदी काठी असलेल्या राममंदिराच्या मागे, बंगला मजिदच्या पाठी मागे असलेल्या नाल्यात, फर्दापुर-सोयगाव रस्त्यावरील बखर, फर्दापुर-जळगाव रस्त्यावर असलेल्या एचपी पेट्रोलपंप च्या बाजूला व फर्दापुर-वरखेडी रस्त्यावर फर्दापुर पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या बिल्डिंग मध्ये जुगाराचे अड्डे सुरू आहे. यासह जामठी, घाणेगाव, सावळदबारा, देव्हारी तसेच सोयगाव पोलीस ठाणे हद्दीतील गोंदेगाव, बनोटी, वरठाण, तिडका, कवली, बहुलखेडा, निंबायती सह ग्रामीण भागात राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामीण पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड हे अपयशी ठरत आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. स्थानिक ते ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयापर्यंत अवैद्य धंदेवाईकांचे हित संबंध असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. ग्रामीण पोलीस अधिक्षक व  उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड यांचे पथक अस्तित्वात असेल तर कारवाई का करीत नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अवैद्य धंदेवाईक व स्थानिक पोलीस प्रशासनासह ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालया पर्यंत असलेल्या नेटवर्कला ग्रामीण पोलीस अधिक्षक छेद देत कारवाई करून अवैध धंदे बंद करण्यात यशस्वी होतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button