महसूल विभागाच्या मनमानी कारभारामुळे आज शेतकऱ्यांच्या उपोषणचा दुसरा दिवस.

सोयगाव दि. १७ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील पहूरी शिवारात लघु सिंचन पाटबंधारे जिल्हा परिषद अंतर्गत संपादीत करण्यात आलेल्या शेतजमीनची खरेदी खताने विक्री करून त्या मध्ये महसूल ने फेर देखील मंजूर केला. त्या शेतजमीन संपादीत असल्याचा पत्र व्यवहार देखील लघु सिंचन पाटबंधारे जिल्हा परिषद केला होता. परंतु तलाठी व मंडळ अधिकारी यांनी आर्थिक फायद्या साठी सातबारा उताऱ्यावर संपादीत असल्याचा फेर घेतला नाही. त्या संदर्भात पहुरी येथील शेतकरी राजाराम जंजाळ व उत्तमराव जंजाळ यांनी महसूल विभाग व लघु सिंचन पाटबंधारे जिल्हा परिषद यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील प्रशासनाचे अधिकारी अर्थपूर्ण झोपत असल्याचे असल्याने शेतकरी यांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केलेली असून या संदर्भात तहसीलदार मनीषा मेने – जोगदंड यांना वेळोवेळी कळविले असल्या नंतर देखील सर्व नियम धाब्यावर बसवून तहसीलदार मनीषा मेने – जोगदंड, मंडळ अधिकारी लक्ष्मण जाधव व शंकर देवतुले यांनी रस्ता मोकळा करून दिला त्यामुळे त्यांच्यावर निंलबनाची कारवाही करण्याच्या मागणीसाठी आज पासून शेतकरी राजाराम जंजाळ व उत्तमराव जंजाळ हे आमरण उपोषणाला बसले आहे. परंतु आज महसूल प्रशासन व लघु सिंचन पाटबंधारे जिल्हा परिषद यांनी कोणतेही दखल घेतली नाही. शेती मशागतीचे काम चालू असताना शेतकऱ्यांना उपोषणाची वेळ येत असल्याने महसूल विभागाविषयी तालुक्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
लघु सिंचन पाटबंधारे जिल्हा परिषद यांनी संपादीत केलेली जमीन खरेदी कोणत्या आधारे झाली ? लघु सिंचन पाटबंधारे जिल्हा परिषद यांनी तात्काळ दखल का घेतली नाही ? तहसीलदार यांनी संपादीत जमीन असल्यानंतर कोणत्या आधारे फेर मंजूर केला ? मंडळ अधिकारी व तलाठी यांनी संपादीत जमीन असल्यानंतर देखील फेर कसा नोंद केला ? तहसीलदार यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील कारवाई का केली नाही ? सदर जमिनीचा वाद न्यायालयात दाखल असताना मंडळ अधिकारी लक्ष्मण जाधव व तलाठी शंकर देवतूले यांनी रस्ता कोणत्या आधारे मोकळा केला असे अनेक प्रश्न शेतकरी यांनी उपस्थित केले आहे. तरी या प्रकरणी जिल्हाधिकारी काय कारवाही करतात हे पाहणे देखील ऑस्तुक्याचे ठरणार आहे.



