क्राईम

दोन धर्मात तेढ करणारे स्टेटस ठेवल्याने बहुलखेडा गावात तणाव, एकास अटक.

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या अफरोज पठाण वर गुन्हा दाखल.

सोयगाव दि. ०९ (वृत्तसेवा) इन्स्टाग्रामवर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी स्टेटस पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल केल्या प्रकरणी मंगळवारी रात्री सात वाजता सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे. दरम्यान या प्रकारामुळे बहुलखेडा गावात चार तास तणाव झाला होता पोलिसांनी मध्यस्थी केल्या ने तणाव निवळला रात्री उशिरापर्यंत बहुलखेडा गावात पोलीस पथक तळ ठोकून होते
अफरोज वजीर पठाण (वय – २१) यांच्या इन्स्टाग्रामवर महापुरुषा बद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याचा प्रकार वाऱ्यासारखा पसरताच तालुक्यातील बहुलखेडा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच सोयगाव चे पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक गजानन आरेकर, गणेश झलवार यांच्या सह पोलिसांनी दुपारी बहुलखेडा घटनास्थळी धाव घेऊन धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आरोपी अफरोज पठाण याला शिताफीने बहुलखेडा जंगलातून ताब्यात घेऊन त्यास सायंकाळी अटक केली. या प्रकरणी निलेश नागपुरे (रा. नारळीबाग सोयगाव वय २२) यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून संबंधिता विरुद्ध धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात भेट देऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक गणेश झलवार, गजानन आरेकर, रविंद्र तायडे,अजय कोळी,जमादार राजू बर्डे आदी पुढील तपास करत आहे.

आरोपी समर्थकांनी घेतले हातात दांडके.

तत्पूर्वी बहुलखेडा येथे आरोपीच्या समर्थनात काही तरुण पुढे आल्यामुळे दोन गट समोरासमोर आले होते. आरोपी समर्थक गटातील तरुणांच्या हातात तलवारी व दांडके दिसून आले. यावेळी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत जमाव पांगवला व परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर सोयगाव पोलिस स्टेशन येथे पोलिसांनी जमलेल्या हिंदू तरुणांचे ऐकून न घेता गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, कलम २९९ अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला.

“आपले आदर्श छत्रपती संभाजी महाराज असून औरंगजेब हा आपला शत्रू होता. औरंगजेबाचे उदात्तीकरण कोणीही देशभक्त भारतीय सहन करू शकत नाही. त्यामुळे अशा समाज कंटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून पुन्हा समाजात तेढ निर्माण होणार नाही व शांतता सुव्यवस्था राहील.” राजुभाऊ फुसे सोयगाव.

Related Articles

Back to top button