युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागिय अध्यक्ष पदी विजय काळे तर उपाध्यक्षपदी समाधान बक्षी.

सोयगाव दि. २३ (वृत्तसेवा) युवा ग्रामीण पत्रकार संघ छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी विजय रमेश काळे यांची एक मताने निवड करण्यात आली. पत्रकार दिनाचे औचित्य साधून युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांनी सोयगाव येथील पत्रकार विजय काळे यांची मराठवाडा विभागिय अध्यक्ष पदी नियुक्ती केली. तर मराठवाडा उपाध्यक्षपदी समाधान बक्षी तर कार्याध्यक्षपदी प्रकाश सातपुरे तसेच छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्षपदी गजानन काळे यांची निवड करण्यात आली.
विजय काळे यांचे सामाजिक, राजकीय,क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व सर्व जनतेला न्याय देण्यासाठी सतत कार्यकरीत असल्याची दखल युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या एका कार्यक्रमात संघाचे मराठवाडा विभागिय अध्यक्ष पदी विजय काळे यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांच्याहस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येऊन निवड करण्यात आली. . विजय काळे यांची मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार संदीप इंगळे, बाळू शिंदे, ईश्वर इंगळे,भास्कर श्रीखंडे, सामजिक कार्यकर्ते अमोल निकम, समाजसेवक दत्तू रोकडे, दिलीप सुरडकर, महेश मानकर, राम सोहनी, शाम पाटील, तुकाराम सोनवणे, गयास पठाण आदींसह प्रतिष्ठित नागरिकांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


