लाकडांनी भरलेला ट्रक पोलिसांनी केला जप्त, निद्रावस्थेत असलेल्या वनविभागाच्या केला स्वाधिन.
सोयगाव पोलिसांची तिडका येथे दभंग कारवाई.

सोयगाव दि. १३ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील तिडका शिवारात लाकडांनी भरलेला ट्रक रविवारी पहाटे तीन वाजता पोलिसांना रात्रीच्या गस्तीवर संशयितपणे आढळून आल्या ची घटना रविवारी पहाटे घडली दरम्यान पोलिसांनी जप्त केलेला ट्रक सोमवारी कारवाई करून पुढील कारवाई साठी सोयगाव वनविभाग च्या ताब्यात दिला आहे. सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड चालु आहे. वनविभाग याकडे डोळे मिटून झोपेचे सोंग घेत असल्याने अखेर पोलीसांना आता वन विभागाचे काम करावे लागत आहे.
तिडका शिवारात रविवारी पहाटे तीन वाजता ट्रक क्र-एम. एच. १७ सी. व्ही. ७४९९ हा लाकडांनी भरलेला अवस्थेत काही ग्रामस्थांना आढळून आला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान रात्रीच्या गस्तीवर असलेल्या उपनिरीक्षक गणेश झलवार, रविंद्र तायडे, गजानन दांडगे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली असता, ट्रक चालक जनार्दन जंगले रा. सारोळा ता. कन्नड यास कागदपत्रे विचारपूस करून ट्रक मालक जुबेर शेख रा. पिशोर ता. कन्नड असे सांगितले त्यावरून संशयित रित्या असल्याचे जाणवले. हा ट्रक जप्त करून सोयगाव पोलीस ठाण्यात लावला दरम्यान सोमवारी पोलिसांनी कारवाई करून सोयगाव वनविभागाच्या ताब्यात दिला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश झलवार, राजू बर्डे, रविंद्र तायडे, गजानन दांडगे, सादिक तडवी आदी तपास करत आहे. पोलिसांच्या कारवाई नंतर तरी निद्रावस्थेत असलेल्या वनविभागाला जाग येते कि अर्थपूर्ण अवस्थेत झोपेचे सोंग घेतात हे पहाणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
मात्र वनविभागाची कारवाई शून्य
सोयगाव पोलिसांनी लाकडांनी भरलेल्या ट्रक सोमवारी (दि. १३) सोयगाव वनविभाग कार्यालयात जमा करूनही सोमवारी रात्री उशीरा पर्यंत सोयगाव वनविभागाने कोणतीही कारवाई केलेली नव्हती. सोयगाव पोलिसांनी वनविभागला दिलेल्या पत्रात २४ तासात कारवाई चा अहवाल सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे. तरी देखील वनविभाग याकडे आर्थिक हिंतसंबंधातुन कारवाई करण्यात विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.



