डाॅ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप नॅशनल अवॉर्डने सोपानजी (दादा) गव्हांडे यांना सन्मानित.

मुंबई दि. २० (वृत्तसेवा) दिल्ली येथे नुकतेच भारतीय दलित साहित्य अकादमीचे तीन दिवसीय सम्मेलन पार पडले या सम्मेलनात देशातून विविध राज्यातील दोन ते तीन हजार बहुजन समाजातील बांधवांनी भाग घेतला होता,त्यामधील काही सामाजिक बांधिलकीतून सामाजिक कार्य करणाऱ्या व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान व साहित्याचा तसेच बहुजन समाजातील गरीब घटकाला सहाय्य करणारे व शासकीय योजनांचा तळागाळातील लोकांपर्यंत योजना घेऊन जाणारे व मदत करणाऱ्या समाज बाधवांचा सन्मान केला जातो. या वर्षांत ऊत्तम काम करणारे महाराष्ट्र मराठा प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष सोपानराव पुंडलीक गव्हांडे यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप नॅशनल अवॉर्ड देऊन सोहनपाल सुमनाक्षर यांनी सन्मानित केले आहे.
सोपानराव गव्हांडे हे एक सामाजिक बांधिलकीतून कार्य करणारे समाज सेवक असून ते नेहमीच शैक्षणिक,सांस्कृतिक व क्रीडाक्षेत्रात कायम भरीव काम करीत असतात, सोपानराव गव्हांडे यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे, सचिव संदीप इंगळे, सामाजिक कार्यकर्ते दत्तू रोकडे, दिलीप सुरडकर, अमोल निकम, भगवान कोथलकर, शाम पाटील, महेश मानकर, अनिल लोखंडे, राम सोहनी, तुकाराम सोनवणे, राम फुसे आदींसह विविध श्रेत्रातील समाज बांधव यांनी त्यांचे अभिनंदन करित शुभेच्छा दिल्या.


