राजकीय

सोयगाव तालुक्यातील मते ठरवणार आमदार, सिल्लोडच्या नजरा सोयगावच्या मतांवर.

सोयगाव दि. २२ (वृत्तसेवा) सिल्लोड सोयगाव मतदार संघातील विजयात सोयगाव तालुक्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे सोयगाव च्या मतांवर सिल्लोड च्या विजयाचे समीकरण जुळविले जात असून आकडेमोड मध्ये सोयगावचा वारंवार उल्लेख येत आहे त्यामुळे अद्यापही सिल्लोड – सोयगाव विधानसभा मतदार संघाचे विजयाचे गणित जुळले नसून मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांनी सोयगावात पाच हजार मतांचे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा केला आहे. तर महायुती चे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी सोयगाव मध्ये नऊ हजार मताधिक्याचा दावा केला आहे. त्यामुळे सोयगावच्या मतांवर सिल्लोडच्या पुढाऱ्यांचा नजरा आहे.

    सिल्लोड – सोयगाव मतदार संघात सोयगाव तालुका आहे दरम्यान सोयगाव तालुक्यातील ५५ हजार १९ पैकी ४२ हजार ४६४ मतदारांनी निवडणुकी मध्ये कौल दिला आहे. मात्र हा कौल कुणाच्या बाजूने आहे हे अद्यापही स्पष्ट न झाल्याने उमेदवारांचे विजयाचे समीकरण शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही जुळले नाही. दरम्यान सोयगाव शहरात झालेल्या ४९२६ आणि फर्दापुर मध्ये झालेल्या ५ हजार ४४७ मतांची गोळाबेरीज विजयात महत्वाची ठरली आहे. त्यात पुन्हा जरंडी गावाचा कौल महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे जरंडी परिसरातील ११ खेडे कुणाच्या पारड्यात वजन देऊन सोयगाव पर्यंत घेऊन येतात हे या निवडणुकीत महत्वाचे आहे. त्यामुळे उमेदवारासह कार्यकर्ते व नागरिकांना शनिवारी जाहीर होणारया निकालाची उत्सुकता लागून आहे.

सोयगावात मताधिक्य घेणारा उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर राहतो असा तीन पंचवार्षिक निवडणुकी पासून इतिहास आहे. त्यामुळे या निवडणुकीत ही सोयगाव च्या मताधिक्य ची उत्सुकता लागून आहे मागील पंचवार्षिक निवडणुकीत अब्दुल सत्तार यांना सोयगावातून नऊ हजार ६५३ मतांचे मताधिक्य होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर, जातीय समीकरण, आणि नाराजीचा सूर यामुळे वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता सोयगावच्या राजकीय सारीपाटा वर आहे…

Related Articles

Back to top button