शिवसेना (शिंदे गट) च्या ताब्यात असलेली आमखेडा ग्राम पंचायतवर आता भाजप चा ताबा.
आमखेडा ग्रामपंचायतीचा सरपंच पदी भाजपाच्या नंदाबाई आगे बिनविरोध, सभागृहात चार सदस्य गैरहजर.

सोयगाव दि. ०४ (वृत्तसेवा) शहराजवळील आमखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपाच्या नंदाताई आगे यांची सोमवारी आयोजित विशेष सभेत बिनविरोध निवड झाली आहे.
आमखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन ढगे हे अपात्र झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर सोमवारी सरपंच पदाच्या निवडीसाठी अध्यासी अधिकारी श्रीमती के. एस. डीघीळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. दरम्यान सभागृहात सरपंच पदासाठी भाजपच्या नंदाताई आगे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे दुपारी दोन वाजता सरपंच पदी नंदाताई आगे (भाजप) या बिनविरोध झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी श्रीमती के. एस. डीघोळे यांनी केली. यावेळी सभागृहात नंदाबाई आगे, पूनम भामरे, सारजाबाई बडक, राजेंद्र गव्हांड, अनिल ठाकरे, बाळू बेदवे या सहा सदस्यांची उपस्थिती होती. तर उपसरपंच मंगलाबाई कोलते, अर्जुन बोडखे, देवयानी तेलंगरे, दिपाली फुसे, हे चार सदस्य सभागृहात गैरहजर राहिले होते. यावेळी ग्राम महसूल अधिकारी महेंद्र वारकड, ग्रामपंचायत अधिकारी सत्यनारायण पूल्लेवाड, लिपिक कडूबा ठाकरे, संगणक चालक धर्मराज पाटील, श्रीराम ढगे यांनी सहायक म्हणून कामकाज पाहिले. दरम्यान भाजपचे नंदाताई आगे यांच्या निवडीची घोषणा होताच जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ. पुष्पाताई काळे, तालुकाध्यक्ष संजय पाटील, तालुका उपाध्यक्ष योगेश पाटील, सुनिल गव्हांडे, संजीवन सोनवणे, मंगेश सोहनी, राहुल राठोड, सुनिल ठोबंरे, ईश्वर क्षीरसागर, शंकर कोथलकर, संजय चौधरी, संजय आगे, संतोष भामरे, विशाल करपे, दिपक पाटील, गजानन बडक आदींनी जल्लोष केला.



