राजकीय
सूर्यभान गवळी यांची शिवसेना (ठाकरे गट) उपतालुका प्रमुख पदी नियुक्ती.
सोयगाव दि. ०६ (प्रतिनिधी) आमखेडा जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना (ठाकरे गट) उपतालुका प्रमुख पदी शुक्रवारी (दि.०६) जरंडी येथील समाजसेवक सूर्यभान कडूबा गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल उपजिल्हा प्रमुख राजू राठोड (ठाकरे गट) तालुकाप्रमुख दिलीप मचे, विभागप्रमुख ज्ञानेश्वरयुवरे, शहर प्रमुख रवींद्र काटोले, युवासेनेचे प्रमुख स्वप्नील पाटील आदिंनी अभिनंदन केले आहे.



