राजकीय

प्रत्यक्ष व फोनवर नागरिकांची एकच चर्चा, तुमच्याकडे कोण घेणार आघाडी भाऊ?

मतदाराने कोणाचे बटन दाबलं यावरील चर्चेला आज होणार पूर्णविराम..

सोयगाव दि. २२ (वृत्तसेवा) सिल्लोड – सोयगाव विधानसभा परिस्थिती आढावा घेण्यासाठी राजकीय जाणकार, कार्यकर्ते, नातेवाईक, मित्र हे एकमेकांना फोन करत तुम्हच्याकडे कोण आघाडीवर होते व कोण पिछाडीवर होते. आमच्याकडे टफ फाईट आहे, अशा आशयाचे फोन करतांना दिसुन आले. त्यामुळे सामान्य मतदारांच्या मनात काय आहे याची प्रचिती आली परंतु मतदार राजाने नक्की काय केलं हे आज दि.  २३ नोव्हेंबरला कळणार असून अंदाज लावण्यासाठी फोन कॉल मात्र सुरूच होते. सिल्लोड – सोयगाव सात मतदारसंघात नोटासहीत २५ उमेदवार उभे आहेत अशात सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात पा दुहेरी शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सुरेश बनकरव लढत झाली असुन कोण निवडून येणार याचे फक्त अंदाज बांधणी सुरू असल्याने मतदानांच्या अगोदर कोणाची हवा होती. तर मतदान प्रक्रिया सुरू झाल्यावर तुमच्याकडे काय चाललंय, तुमच्याकडे हे फुटले, ते फुटले, त्यात त्यांनी त्याचे काम केले, की यांचे केले अशा अनेक घटना समोर येत असल्याने शेवटी मतदार राजाने आत जाऊन कोणतं बटन दाबलं हे सांगणं कठीण झालं आहे. त्याला पाहता मन की शांती म्हणून एकमेकांना कॉल करून विचारना होत होती. सिल्लोड – सोयगाव विधानसभा मतदारसंघात  अब्दुल सत्तार हे पुन्हा निवडुन येणार की सुरेश बनकर येणार यावर अनेक आज दि. २३ शनिवार रोजी निकाल कळणार आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते गुलाल घेऊन निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे. या संदर्भात सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात आमच्या प्रतिनिधीनी नागरिकांसोबत अंदाज जानुन घेण्याचा प्रयत्न केला असता सुरेश बनकर आमदार होणार असल्याचा अंदाज लावल्या जात आहे.

Related Articles

Back to top button