व्हायरल रेकॉर्डिंगचा महायुतीच्या उमेदवारास निवडणुकीत फटका बसणार असल्याची नागरिकांमध्ये चर्चा.
दादागिरी व दहशतवादाचे ज्वलंत उदाहरण सोयगाव च्या सोशल मिडीयागृपवर...

सोयगाव दि. ०७ (वृत्तसेवा) सिल्लोड – सोयगाव विधानसभा मतदार संघाचे महायुती चे उमेदवार असलेले अब्दुल सत्तार यांना हाजी बबलू च्या दहशतीचा मतदान रुपी फटका बसणार असल्याची चर्चा सोयगाव शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये रंगली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील सोयगाव तालुका शासकीय अधिकाऱ्यांवर आमदाराचे नातेवाईक असल्याने बबलू हाजीची दहशत असल्याची चर्चा आहे. सोयगाव नगरपंचायत मध्ये अब्दुल सत्तार यांची एकहाती सत्ता आहे. नगराध्यक्षा, नगरसेवक हे नावालाच आहेत. सर्वसामान्य नागरिकांना नगरपंचायत कडून लागणाऱ्या प्रमाणपत्र, घर बांधण्यासाठी लागणारी परवानगी घ्यायची असल्यास कर्मचारी, अधिकारी बबलू हाजीच नाव सांगतात. त्यांनी सांगितले शिवाय तुमचे काम होणार नाही असे दम भरल्यासारखे सांगितले जात असल्याची चर्चा शहरातील नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. नगरपंचायत कार्यालयाशी बबलू हाजीचा काही संबंध येत नाही. परंतु आमदाराचा नातेवाईक असल्याने सर्वसामान्य नागरिकांना हाजीचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. स्वपक्षी असला तर काम होईल, विरोधी माणसासोबत बोलतांना दिसला किंवा शेठ विषयी विरोध दर्शक जरी बोलतांना आढळला तर त्याचे काम रखडले जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. सर्वसामान्य जनता तर कंटाळली तर आहेच परंतु तहसीलदार, गटविकास अधिकारी, वनविभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मृद व जलसंधारण, पाटबंधारे, पोलीस ठाणे, भूमिअभिलेख, महावितरण आदी कार्यालयाचे अधिकारी यांच्यावर सुद्धा बबलू हाजीची दहशत असून बबलू हाजीला विचारल्या शिवाय अधिकारी काहीच करीत नाही. सर्वसामान्य नागरिकांनी तालुका स्तरीय अधिकाऱ्यांसह, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्या पाच वर्षात अनेक तक्रारी केल्या, वेळोवेळी आमरण उपोषण, जल समाधी या सारखे आंदोलन केली परंतु अद्यापही वरिष्ठांकडून चौकशी करून कार्यवाह्या झाल्याच नाही. त्यामुळे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात तरी लोकशाही जिवंत राहिली नाही असेच म्हणावे लागेल. तालुक्यात बबलू हाजीच्या दहशतीचा फटका महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना मतदान रुपी बसणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगली आहे.

बबलू हाजी व भाजपातून बंडखोरी करून शिंदे गटात प्रवेश केलेले नगरसेविका पति यांच्या दलित वस्ती विकास, दलित स्मशानभूमी विकासा संदर्भात समाजसेवक अंकुश पगारे यांनी भ्रमणध्वनीद्वारे हाजी बबलू व नगरसेविका पति कदिर शहा यांच्याशी साधलेल्या संपर्काच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या संभाषणात नगरपंचायत शी काहीही संबंध नसलेला बबलू हाजी सांगत आहे. नगरपंचायत गरीब आहे, गावातून पाच टक्के सुद्धा वसूली नाही, त्यामुळे अडचण आहे. मुख्याधिकारी कशासाठी आहे असा प्रश्न समाजसेवक अंकुश पगारे यांनी उपस्थित केला आहे. नगरपंचायतच्या कारभारात बबलू हाजी ढवळाढवळ करीत असल्याने अब्दुल सत्तार यांना निवडणुकीत शहरात मोठा फटका बसणार हे निश्चित आहे.


