महाराष्ट्र

आचारसंहितेच्या काळात देखील महसुलचे अधिकारी दहशतीत, जिनिग प्रेसिंग येथे साठवून ठेवलेल्या वाळू साठा वाहतुकीवर कार्यवाही करण्यास टाळाटाळ –

महसूल पथक कागदांवर देखील अपूर्ण...

सोयगाव दि. २९ (वृत्तसेवा) सोयगाव -.जरंडी रस्त्यावरील पिंप्री फाट्याजवळ असलेल्या जिनिंग प्रेसिंग परिसरात साठवून ठेवलेल्या वाळू साठ्याची इतर ठिकाणी वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार दि. ३१ गुरुवार रोजी सकाळी उघडकीस आला याबाबत तलाठी जरंडी सजेचे तलाठी महेंद्र वारकड यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता आपण तहसीलदार मॅडम शी बोलावे असे सांगितल्याने आचारसंहिता सुरू असताना सोयगाव महसूल विभाग किती दहशतीत आहे याचा प्रत्यय गुरुवारी निदर्शनास आला आहे.

           याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव – जरंडी रस्त्यावर पिंप्री फाट्याजवळ असलेल्या जिनिंग प्रेसिंग वर अवैधरीत्या पन्नास, साठ ब्रास वाळूचे साठे साठवून ठेवले होते. काही महिन्यांपूर्वी याबाबत जरंडी सजेचे तलाठी महेंद्र वारकड यांना माहिती दिली होती. तलाठ्याने या ठिकाणी भेट दिली मात्र राजकीय नेत्याची असल्याची चुणूक लागताच पंचनामा न करताच तलाठी गेल्या पावली मागे फिरले. व जिनिंग प्रेसिंग बांधकाम करण्यासाठी वाळू आणलेली आहे व रॉयल्टी पावत्या त्यांच्याकडे आहे असे तोंडी सांगितले मात्र पावत्या बाबत माहिती दिली नाही. राजकीय पुढाऱ्याच्या नावाखाली जिनिंग प्रेसिंगवर वाळू साठे साठवून ठेवले असल्याने तहसीलदारासह कागदावरच असलेल्या गौनखनिज पथकातील अधिकाऱ्यांची कार्यवाही करण्याची हिम्मत झाली नाही. दि. ३१ गुरुवार रोजी सकाळी चार ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने जिनिंग प्रेसिंगवर साठवून ठेवलेली वाळूची इतर ठिकाणी वाहतूक केली जात होती. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी गौनखनिज पथकातील तलाठी महेंद्र वारकड यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. मात्र त्यांनी तहसीलदार मॅडम यांच्याशी संपर्क करा असे सांगितले. यामुळे महसूल कार्यालयाकडून अवैधरीत्या गौनखनिज वाहतूक करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी भरारी पथक तयार करण्यात आले आहे मात्र ते कागदावरच आहे. तहसीलदार मॅडम यांनी सांगितल्या शिवाय कार्यवाही करणे तर दूरच, जायमोक्यावर जाण्याची हिंमत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये नसल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून या अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावर शंका उपस्थित केली जात आहे. सत्तेपुढे अधिकारी नतमस्तक होत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. आचारसंहितेत सुद्धा कार्यवाही होत नसल्याने तालुक्यात लोकशाही संपुष्टात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

तहसीलदार वर बदली चा आशीर्वाद –

लोकसभा निवडणुकीत चुकीचे कर्तव्य केल्याचा ठपका ठेवून सोयगाव च्या तहसीलदार मनीषा मेने यांची बदली प्रक्रिया गतिमान झाली असल्याची चर्चा हि त्यावेळी होती. परंतु त्यांना बदली रुपी आशीर्वाद दिल्या ने अवैधरीत्या गौनखनिज वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाया स्थगित होत असल्याची चर्चा सोयगावात रंगू लागली आहे..

Related Articles

Back to top button