फर्दापूर पोलीस ठाण्यांतर्गत सुरू असलेले अवैध धंदे बंद होता होईना, ग्रामीण पोलीस अधिक्षकांसमोर आवाहन.
पोलिसांचेच लागेबांधे...

सोयगाव दि. २० (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस ठाण्या अंतर्गत फर्दापूर बिट, सावळदबारा बिट सह ग्रामीण भागात मटका, जुगार, गावठी दारू व अवैध देशीदारू सारखे सर्रास सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामीण पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया हे अपयशी ठरत आहे.
फर्दापूर पोलीस ठाण्यांतर्गत सुरू असलेल्या अवैध धंद्यांचे आर्थिक कनेक्शन ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयापर्यंत असल्याने स्थानिक पोलीस प्रशासन कारवाई करीत नसल्याने दिवसेंदिवस अवैध धंद्यात वाढ होत आहे. फर्दापूर ठाणे अंतर्गत अवैध धंदे सर्रास सुरु असून यामुळे अनेक गोरगरीबांचे संसार रस्त्यावर येत आहे. कोरोनाचा काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला होता. त्यातच अतिवृष्टीने अनेकांचे संसार मोडकळीस येत असतांना या वर्षी देखील पावसाने वेळेवर पाऊस कमी झाल्याने शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहे. त्यातच परिसरात अवैद्य धंदे वाढल्याने तरुण वर्ग आर्थिक, मानसिक त्रासामुळे व्यसनाधिंतेकडे वळला असून तरुण पिढीच आयुष्य धोक्यात आले आहे. फर्दापूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या फर्दापूर परिसरासह सावळदबारा बीट अंतर्गत सुरू असलेल्या अवैध धंदेवाईकांशी पोलीस प्रशासनाचे आर्थिक संबंध असल्यामुळे कारवाई होत नाही. ग्रामीण भागातील धार्मिक स्थळे, प्राथमिक शाळा परिसर व मुख्य रस्त्यावर खुलेआम मटका, अवैध देशीदारू व गावठी दारूची विक्री राजेरोसपणे सुरु असल्याने शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या महिलांना तळीरामांचा त्रास सहन करावा लागत आहे. तर लहान मुलांवर दुष्परिणाम होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून ११० किमी अंतरावर असलेल्या सोयगाव तालुक्यातील फर्दापूर परिसरातील अवैध धंद्याविरोधात बातम्या प्रकाशित झाल्यातर स्थानिक पोलीस प्रशासन थातुरमातुर कारवाई करून ग्रामीण पोलीस अधिक्षकांची दिशाभूल करीत आहे. मात्र अवैध धंदे सुरूच आहे. इतकेच नव्हे तर फर्दापूर पोलीस ठाण्यांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील गुन्हेशाखेचे पथक अवैध धंद्यावर छापा मारण्यासाठी फर्दापूर कडे येत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळत असल्याने त्यांच्या हस्तकांमार्फत ही माहिती अवैध धंदेवाईकांना दिली जात असल्याने त्या दिवशी ठाण्यांतर्गत अवैध धंदे दिवसभरासाठी बंद केले जातात. अवैध धंदेवाईक व स्थानिक पोलीस प्रशासनासह ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत असलेल्या नेटवर्कला छेद देत फर्दापूर पोलीस ठाण्यांतर्गत सुरू असलेल्या अवैध धंदे बंद करण्याचे आवाहन ग्रामीण पोलीस अधिक्षक कसे पेलणार याचीच चर्चा सद्या परिसरात रंगत लागली आहे. तर अधिक्षक काय कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
पोलीस व अवैध धंदेवाईकांचे आर्थिक हित संबंध…
ड्राय – डे असो की सणवार तालुक्यात गावठी व अवैध देशी दारू ची सर्रास विक्री केली जात आहे. अजिंठा लेणी परिसरात देश – विदेशातून पर्यटक येत असतात. त्यात जवळच असलेले फर्दापूर गाव त्यामुळे अनेक हॉटेल (लॉजिग) मध्ये मुकामाला येत असतात. छत्रपती संभाजीनगर – जळगाव महामार्गावर हॉटेल (लॉजिंग) च्या मागेच तसेच फर्दापूर गाव परिसरात अनेक ठिकाणी मुंबई, कल्याण, मटका, तसेच पत्ता खेळविला जात असल्याने मुख्य रस्त्यावर खेळणारे व दारू पिणारे यांची वरदळ असल्याने महिला व मुलींना मोठा त्रास सहन करावा लागत असून महिलांसह देश – विदेशातून आलेल्या पर्यटकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. यामुळे पोलिसांच्या या भूमिकेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तर अवैध धंदेवाईकांचे व फर्दापूर पोलीसांचे आर्थिक हितसंबंध थेट गुन्हे अन्वेषण शाखा ते ग्रामीण पोलीस अधिक्षेक कार्यालयापर्यंत असल्याने तालुक्यात सर्रास सुरू असलेल्या अवैध धंदे बंद करणे हे पोलीस अधिक्षकांसमोर मोठे आवाहन उभे राहिले असून यात पोलीस अधिक्षेक गोरगरिबांचे उध्वस्त होणारे संसार थांबविण्यास कितपत यशस्वी होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



