शिक्षण विभागाने मनमानी करीत केलेली प्रतिनियुक्ती अखेर रद्द.

सोयगाव दि. ०२ (वृत्तसेवा) तालुक्यातील आमखेडा येथील जिल्हा प्राथमिक शाळा येथे चार एकूण चार शिक्षकांचे पदे मंजूर असून त्यात पहिले ते पाचवीचे वर्ग आहे. त्यात ९६ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना शिकविण्यासाठी तीन शिक्षिका तर एक शिक्षक असे असून त्यातील शिक्षिका सविता पाटील यांना प्रभारी मुख्यध्यापिका पदभार देण्यात आला आहे. तसेच शिक्षिका कामिनी बोरसे व शिक्षक राहुल राठोड यांच्या कडे निवडणूक विभागाने बी.एल.ओ. चे कामकाज दिले आहे. त्यात दि. २७ बुधवार रोजी तालुका शिक्षण विभागाने मनमानी करून राहुल राठोड यांची प्रतिनियुक्ती करून बनोटी केंद्रातील जि. प. प्रशाला बनोटी येथे नियुक्ती दिली आहे. तीन शिक्षिकांना पाच वर्गाचा भार सांभाळावा लागणार असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे संतप्त पालकांनी दि. २९ शुक्रवार रोजी तालुका गट शिक्षण अधिकारी यांना लेखी पत्र देऊन तात्काळ राहुल राठोड यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात यावी किंवा त्याऐवजी दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती जि. प. प्रा. शाळा आमखेडा येथे करण्यात यावी अन्यथा शाळेला कुलूप लावून तालुका गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर शाळा भरवणार असल्याचे निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार दि. ०१ जानेवारी रोजी संतप्त पालकांनी जि. प. प्राथमिक शाळा आमखेडा येथे शाळेला कुलूप लावण्यासाठी एकत्र आले असता त्यावेळी गट शिक्षण अधिकारी रंगनाथ अडाव यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता एकरा वाजता केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांना पाठवून लेखी आश्वासन दिले. कि दि. ०४ पासून राहुल राठोड हे पुन्हा आमखेडा येथे रुजू होतील. अशा स्वरूपाचे लेखी आश्वासन केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांनी जमलेल्या पालकांना दिले त्यामुळे पालकांनी तालुका शिक्षण विभागाचे आभार मानले. यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष विश्वनाथ कोथलकर, ग्रा. प. सदस्य अर्जुन बोडखे, वसंत वराडे, अनिल लोखंडे, संदीप मिसाळ, दत्तू पोटदुखे, अर्जुन ढगे, धनराज तेलंग्रे यांच्या सह पालक वर्ग उपस्थित होता.



