माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे यांची सोयगाव तालुका सरचिटणीस पदी निवड.

सोयगाव दि. २७ (वृत्तसेवा) माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे यांच्या कामाची दखल घेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश सचिव सुरेश बनकर, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश प्रभारी राजू शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा किशोर जगताप यांच्या आदेशाने सोयगाव तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करीत असल्याचे नियुक्ती पत्र माजी पंचायत समिती सदस्य संजीवन शंकर सोनवणे यांना देण्यात आले. या निवडी बद्दल जिल्हा सरचिटणीस वसंत बनकर, माजी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे, शहराध्यक्ष योगेश पाटील, उपतालुकाध्यक्ष सुनील ठोंबरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष मयूर मनगटे, भिवा चव्हाण, दिपक पाटील, दिलीप पाटीलसह भाजपा कार्यकर्त्यांनी सोनवणे यांचे अभिनंदन केले.


