आपला जिल्हाक्राईम

तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वारात अजुनही पत्तेच पत्ते.

सोयगाव दि. १६ (वृत्तसेवा) तालुक्यात अवैद्य धंद्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे तालुका प्रशासनाच्या लक्षात रहावे या साठी तहसील कार्यालय समोर शुक्रवारी अज्ञात इसमाने फेकलेले पत्ते सोमवार (दि. १६) पर्यंत कोणीही उचलले नसल्याने आठवड्याच्या पहीलील्याच दिवशी तहसील कार्यालयाच्या परीसरात अवैद्य धंद्यांविषयी चर्चा रंगली होती. तालुक्यातील अवैद्य धंद्ये बंद करण्यात यावे यावे यासाठी प्रशासन का लक्ष देत नाही. ठिक ठिकाणी ऑनलाईन जुगार, जन्ना मन्ना जुगार, कल्याण-मुबंई सट्टा, पत्याचे क्लब, तसेच मुख्य देशी विदेशी दारु सह गावठी हातभट्टीची दारु तालुक्यात ठिक ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात आहे.
सोयगाव शहरातील मुख्य रस्त्यावर (राज्य रस्ता क्र. २४) शासकीय विश्रामगृह प्रवेश द्वारापासुन, तहसील कार्यालय मुख्य प्रवेश द्वार, ग्रामीण रुग्णालयाच्या समोर ते बसस्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौक ते एच. पी. पेट्रोल पंप फर्दापुर रोड व जुना बाजार चौक मुख्य रस्ता, सोयगाव – चाळीसगाव रोड ते संत ज्ञानेश्वर महाविद्यालय परीसरात पत्ते टाकल्याची घटना दि.१३ शुक्रवार रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आली होती. शहरात फेकलेले पत्ते तर नगरपंचायत कर्मचारी यांनी स्वच्छता केली मात्र तालुक्याचे मुख्य कार्यालय असलेले तहसीलदार यांच्या कार्यालयात शिपाई व कोतवाल हे डझन च्या वर आहे. मात्र प्रवेशद्वारासमोर फेकलेले पत्ते उचलायला तहसील कर्मचारी यांना मुहूर्त मिळत नाही का असा प्रश्न निर्माण होतो आहे. शासकीय कार्यालय असलेले तहसील कार्यालयाच्या समोर पत्ते फेकून महसुल विभागाची मस्करी करणाऱ्या व्यक्तींवर तालुक्याचे जबाबदार व कर्तव्यदक्ष असलेले तहसीलदार मोहणलाल हारणे हे कारवाई करण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाला काय सुचना देतात हे पाहणे ओस्तुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button