ताज्या घडामोडी

फर्दापुरात पादुका दर्शन सोहळ्याची पूर्वतयारी..

सोयगाव दि.०३ (वृत्तसेवा) जगद्गुरू श्री. स्वामी नरेन्द्राचार्य महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याची पूर्वतयारी दि. ०३ मंगळवार रोजी अंतिम टप्प्यात आली आहे दि. ०५ गुरुवार रोजी अंजिठा लेणीच्या पायथ्याशी ठाणा शिवारात भव्य मैदानावर हा सोहळा पार पडणार असून या सोहळ्याच्या पूर्वतयारीची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांनी केली आहे.

सोयगाव तालुक्यात अजिंठा लेणीच्या पायथ्याशी होत असलेल्या पादुका दर्शन सोहळा व उपासक दिक्षा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्यासाठी जिल्हाभरातील लाखो भाविकांची उपस्थिती लाभणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्र चार्य महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्यासह दहा हजार भाविकांची उपासक दिक्षा घेण्यासाठी नोंदणी झालेली असल्याची माहिती जिल्हा निरीक्षक संदीप थोरात यांनी दिली. दरम्यान या दर्शन सोहळ्यात महाप्रसाद साठी जरंडी गावात २२ क्विंटल बुंदी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान या कार्यक्रमाला एक लाख भाविक उपस्थित राहणार असून त्यांची सर्व तयारी करण्यात आली आहे. मंगळवारी या कार्यक्रमाची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी जिल्हा निरीक्षक संदीप थोरात, महिला जिल्हाध्यक्ष निर्मला ताई करपे, जिल्हाध्यक्ष साहेबराव आहेर, तालुकाध्यक्ष संतोष झोड, सुभाष काळे यांच्या सह सर्व जिल्हा कमेटी भक्त साधक, शिष्य, उपासक यांनी पुढाकार घेतला आहे.

Related Articles

Back to top button