जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंजनाई गोशाळेत ना. त. संभाजी देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण.

सोयगाव दि. ०५ (प्रतिनिधी) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अंजनाई गोशाळा आमखेडा ता. सोयगाव येथे दि. ०५ गुरुवार रोजी सोयगाव तहसिल कार्यालयाचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार तथा नगर पंचायत सोयगाव प्रभारी मुख्याधिकारी संभाजी देशमुख यांच्याहस्ते विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा संचलित अंजनाई गो शाळा रावेरी शिवार घटोत्कच लेणी रस्ता आमखेडा ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोयगाव तहसिल कार्यालयाचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार तथा सोयगाव नगर पंचायत प्रभारी मुख्याधिकारी संभाजी देशमुख, दिपक फुसे, संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, सचिव दिलीप शिंदे, सह सचिव अनिल लोखंडे यांच्याहस्ते वड, लिंब, चिंच, बदाम, उंबर, गुलमोहर, खारीक, आदींसह विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान संभाजी देशमुख यांनी गोशाळेची पाहणी करीत अध्यक्षांकडून सविस्तर माहिती घेतली. गोमातेचे संगोपन पाहून त्यांनी समाधान व्यक्त करीत गोमातेच्या संगोपन साठी संस्थेच्या संचालकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ना. त. तथा सोयगाव नगर पंचायत प्रभारी मुख्याधिकारी संभाजी देशमुख व दिपक फुसे यांचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर गाडेकर, अशोक ढगे बापू ठाकरे, भागवत दणके व रवी ठाकरे यांची उपस्थिती होती.



