महाराष्ट्र

अवैद्य वाळू माफिया व महसुल विभागाचे अर्थपुर्ण हिंतसबध….

महसूलचे अपूर्ण गौनखनिज भरारी पथक कागदांवरच...

सोयगाव दि. २९ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथील वाघूर नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूची सर्रास वाहतूक केली जात आहे. महसुलचे गौनखनिज भरारी पथक कागदावरच असल्याचा प्रत्यय पुन्हा मंगळवारी पहायला मिळाला. अवैधरीत्या गौनखनिज वाहतूक करणारांवर कार्यवाही होत नसल्याने गौण खनिज माफिया व महसुलचे आर्थिक लागेबांधे असल्याची चर्चा फर्दापुरात रंगली आहे. कार्यवाही करणार कोण असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, दि. २५ शुक्रवार रोजी फर्दापुर येथील वाघूर नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूची दिवसाढवळ्या वाहतूक केली जात असल्याची माहिती फर्दापुर तलाठी श्रीमती शिल्पा बोपटे यांना भ्रमणध्वनीद्वारे  देण्यात आली होती. मात्र फर्दापुर तलाठी कार्यालयाचा झिरो शुभम रावळकर यास याबाबत कशी माहिती मिळाली व तो  घटनास्थळी आला. संबंधित ट्रॅक्टर चालकास मंडळ अधिकारी व कोतवाल येत असल्याची माहिती दिली. पथक येण्यापूर्वीच ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर मधील वाळू शेतात टाकून पळ काढला होता. शेतात उपसा केलेल्या वाळूचा महसूल विभागाकडून पंचनामा करून ट्रॅक्टर चालक व माहिती देणाऱ्या झिरो शुभम रावळकर यांच्यावर कार्यवाही करण्यात आली नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान दि. २५ तारखेपासून आजतागायत वाघूर नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूची दिवसाढवळ्या सर्रासपणे वाहतूक केली जात आहे. यामुळे शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडत आहे. वाघूर नदी पात्रातून वाळूचा उपसा करून नदी पात्राच्या कडेला अवैधरीत्या वाळुंच्या थप्प्या होत्या. मात्र २५ तारखेपासून आतापर्यंत महसूल विभाग व भरारी पथकाकडून वाळुंच्या थप्प्यांचा पंचनामा करून ताब्यात घेतल्या नाहीत. अनेक थप्प्या वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांनी लंपास केल्या आहेत. तलाठी, महसूल विभाग व गौनखनिज माफियांचे झिरो मार्फत लागेबांधे असल्याने कार्यवाही केली जात नसल्याची चर्चा फर्दापुर गावात रंगली आहे. जिल्हा अधिकाऱ्यांकडून याची दखल घेऊन कार्यवाही केली जाते किंवा नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button