सायबर सुरक्षा व करियर गाईडन्स जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न.

सोयगाव दि. २० (वृत्तसेवा) या दरम्यान विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अप च्या माध्यमातून निर्माण होणारे धोके व त्या पासून होणारे दुष्परिणाम या संदर्भात सायबर सुरक्षा व करियर गाईडन्स जनजागृती चा कार्यक्रम जिल्हा परिषेद हायस्कूल सोयगाव व जरंडी येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे एम. के. सी. एल. चे अध्ययन केंद्र साईवनशा कॉम्पुटर सोयगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे हर्षवर्धन सिरसाठ यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षाचे व करियर मार्गदर्शन व दैनंदिन होणाऱ्या सायबर गुन्ह्यापासून आपण कसे सावधान राहिले पाहिजे व ऑनलाईन विविध एप पासून होणारे धोके व त्यापासून आपली सुरक्षा कशी करावी या अतिशय मौल्यवान विषयी व करियर मार्गदर्शन या विषयावर १० वी चे परीक्षासंधार्भात टाईम म्यानेजमेंट कसे करावे पेपर कसे लिहावे आणि परीक्षेमद्धे जास्तीत जास्त गुण मिळावे यासंधार्भात १० वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईवनशा कॉम्पुटर सोयगाव केंद्राचे संचालक बिराजी गायकवाड यांनी केले व परीक्षेसाठी मुलांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर व जरंडी शाळेचे मुख्याध्यापक महाजन सर यांच्या सह शिक्षकांनी विशेष सहकार्य केले.



