कवी माणिक सोनवणे यांना बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मानित.

सोयगाव दि. १७ (वृत्तसेवा) सोयगाव येथील कवी माणिक सोनवणे यांना दि.१२ शुक्रवार रोजी पुणे येथे एस.एम. जोशी सभागृहात झालेल्या २५ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात, बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन पुणे, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध, भगवान महावीर शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाघोली पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनात सोयगाव येथील कवी माणिक सोनवणे यांना बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार देऊन सन्मान गौरविण्यात आला.
कवी माणिक सोनवणे हे सोयगाव येथील राहाणारे आहेत. त्यांच्या ग्रामीण गावबोली भाषेतून अतिशय उत्कृष्ट दर्जेदार कविता लिहिणारे ते अस्सल कवी आहेत. त्यांच्या कविता वाचताना, ऐकताना, मनाला भुरळ पाडून त्यांच्या कवितेच्या शैलीमुळे, माणूस हा त्यांचा चाहता होताना दिसतो.
निवळ साधे सरळ शब्दांची कविता, त्यातील भाव मात्र, हा प्रत्येकाला आप आपलासा वाटतो. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा चाहता वर्ग ही वाढलेला दिसून येत आहे. आता त्यांना मातब्बर कवी म्हणून ही म्हटलं जात आहे.
त्यांना या अगोदर वेगवेगळ्या साहित्य समूहातून झालेल्या काव्य स्पर्धेतून ही, शब्दरत्न, उत्कृष्ठ, भावस्पर्शी, उतेजनार्थ, ह्या क्रमांकाने ही सन्मानपत्र देऊन साहित्य समूहाद्वारे सन्मानित करण्यात आलेले आहे.
त्यांचे लिखानचे प्रकारे दुक्षरी, चाराक्षरी, रोहिपंचाक्षरी, हायकू, गजल, अभंग, मराठी गीत, लावण्या, वैगरे लिहिलेल्या दिसून येतात. मात्र अष्टाक्षरी काव्य रचनातल्याच कविता त्यांच्या तोंडून ऐकण्यास व वाचण्यात जास्त आलेल्या आहेत.
त्यांना मिळालेल्या बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार बद्दल त्यांच्या चाहत्या वर्गातून व साऱ्याच स्तरातून कौतुकारूपी शुभेच्छा देताना लोक दिसत आहेत. यावेळी बंधुताचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रकाश रोकडे, मधूश्री औव्हाळ, स्वागता अध्यक्ष जेष्टकवी प्रा. चंद्रकांतदादा वानखेडे, उद्धघाटक डॉ. मनोहर जाधव, पूर्वा अध्यक्ष प्रा. शंकर आथरे, व इतर मान्यवरांची उपस्थिती ह्या संमेलनला लाभलेली होती. तसेच संमेलनामध्ये निमंत्रित कवींच्या कविता सादरीकरण करण्यात आल्यात व काही उलेखनिय कवींना वेगवेगळ्या पुरस्काराने ही सन्मानीत करण्यात आले.


