महाराष्ट्र

राज्यातील हजारो दिव्यांग करणार मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर आंदोलन…

सोयगाव दि. ०१ (प्रतिनिधी) मुंबई मंत्रालय वर आकाशवाणी येथे आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या आंदोलन दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तर्फे मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या खोटे आश्वासन हे हवेत उडाले असल्याने दिव्यांगाच्या मागण्या कोणत्याही पूर्ण न झाल्याने दि. ०४ शुक्रवार रोजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील हजारो दिव्यांग ठिय्या आंदोलन करणार आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, बुधवार दि. २५ सप्टेंबर रोजी मुंबई मंत्रालय वर आकाशवाणी आ. निवास या ठिकाणी प्रहार प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दिव्यांगांचे आंदोलन झाले होते. सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदोलन रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तब्बल पाच तास धो – धो पावसामध्ये सुरू होते. या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना पुढाकार घेऊन दिव्यांगांना संजय गांधी निराधार अनुदान वाढवून देण्याचे आदेश दिले होते. शासनाच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आमदार बच्चू कडू यांना व दिव्यांगांना भर पावसात जाहीर आश्वासन दिले होते. की दि. ३० सप्टेंबर सोमवार रोजी होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत दिव्यांगांचे मासिक मानधन वाढविण्यात येईल. इतर मागण्या संदर्भात मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावले जातील. याच वेळी बच्चु कडू यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना इशारा दिला होता. की आम्हाला खोटे आश्वासन दिल्यावर तुमच्या घरावर आंदोलन करू परंतु झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळात दिव्यांगांचे मानधन एक रुपयाने देखील वाढविण्यात आले नाही. त्यासोबतच दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठक देखील बोलविण्यात आली नाही. मंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरडे आश्वासन दिल्यामुळे राज्यातील लाखो दिव्यांग नाराज झाले असून आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली दि. ०४ ऑक्टोबर शुक्रवार रोजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील घरावर हजारो दिव्यांग आंदोलन करणार असल्याचे प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांनी जाहीर केले आहे..

दिव्यांगांच्या तोंडाला पाणी पुसणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध करण्यासाठी राज्यातील हजारो दिव्यांगांनी सिल्लोड येथे निषेध आंदोलनाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार अपंग क्रांती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे. या आंदोलनाला स्वतः बच्चुभाऊ उपस्थित राहणार असल्याने राज्यातील दिव्यांग मोठ्या प्रमाणात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तरी जास्तीत जास्त दिव्यांगानी सिल्लोड येथे हजर राहण्याचे आवाहन जिल्हाअध्यक्ष शिवाजी गाडे, सोयगाव तालुकाध्यक्ष संदीप इंगळे, सिल्लोड तालुकाध्यक्ष शांताराम बनकर यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button