आपला जिल्हाराजकीय

अब्दुल सत्तार रुपी राक्षचा निवडणुकीत वध करायचा – इद्रीस मुलतानी.

जंगलातांड्यात शिंदे गटाला खिंडार, शंभर पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

सोयगाव दि. ०६ (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यातील जंगलातांडा व फर्दापूर तांडा येथील प्रदीप राठोड व करण चव्हाण यांच्यासह शंभर पेक्षा जास्त युवा कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेश सरचिटणीस वसंत बनकर, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, व्हीजेएनटी प्रदेश जयप्रकाश चव्हाण, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पुष्पाताई काळे, तालुकाध्यक्ष बद्री हजारी यांच्या उपस्थितीत दि. ०५ गुरुवार रोजी भाजपात जाहीर प्रवेश करीत भाजपचा झेंडा हाती घेतल्याने शिंदे गटाला मोठे खिंडार पडले आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जंगलातांडा गाव भगवेमय झाले होते. संत सेवालाल महाराज सभागृह जंगलातांडा येथे प्रवेश सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. युवा कार्यकर्त्यांना पक्षाचा गमचा देऊन पक्षात स्वागत करण्यात आले.

यावेळी विधानसभा निवडणुकीत कोणताही झेंडा हाती घेऊन विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे ज्ञानेश्वर मोठे यांनी निर्धार व्यक्त केला. अब्दुल सत्तार यांना वडीलधाऱ्या माणसाशी व युवकांशी कसे बोलावे हे सुद्धा कळत नाही. काही दिवसांपूर्वी जंगलातांडा येथे वाद झाला होता. वादाचे मी समर्थन करीत नाही. गावात शांतता राहावी वाद होता कामा नये. गावातच वाद मिटवावा. परंतु तुमच्या गावामध्ये हाजी बबलू याने वाद लावले. तुम्ही दादागिरी करू नका, आम्ही करू शकतो. गाव शांत रहायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आमच्या कार्यकर्त्यांना त्रास झाला तर जशाच तसे उत्तर दिले जाईल त्यामुळे कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये. येत्या विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवार कुणीही असो परंतु अब्दुल सत्तार रुपी राक्षचा वध आपण सर्वांनी मिळून करायचा आहे. त्यासाठी सतर्क रहा असे आवाहन अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी केले. आपला उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा राहणारच आहे. त्याला निवडणून आणण्यासाठी आपण एक संघ रहावे. तुम्हाला मी ०५, १० लाखाचे काम देतो अशा अनेक प्रकारच्या भूलथापा तुम्हाला देईल त्याच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन प्रदेश सरचिटणीस सुरेश बनकर यांनी कार्यकर्त्यांना केले. कार्यकर्त्यांच्या प्रवेश सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मा. प. स. सदस्य संजीवन सोनवणे, नगरसेवक राजेंद्र जावळे, रऊफ देशमुख, धनराज राठोड, दिलीप पाटील, संजय पाटील, सुनील गावंडे, मयूर मनगटे, मंगेश सोहनी, सुनील ठोंबरे, संजय मोरे, राहुल भैय्या परदेशी, रविंद्र चव्हान, उखा चव्हाण,विष्णु पंत, पांडुरंग जाधव आण्णा तांगडे, योगेश शिंदे, समाधान बावस्कर व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Related Articles

Back to top button