महाराष्ट्र

शेंदुर्णीमध्ये दोन गटात दगडफेक, पाच ते सहा जण जखमी.

जळगाव दि. ०६ (प्रतिनिधी संतोष महाले) जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे व्यायाम शाळेत काही तरुणामध्ये झालेल्या बाचाबाचीतून दोन गटात हाणामारी होऊन त्याचे दगडफेकीत रुंपातर झाल्याची घटना दि. ०४ बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे. यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान पोलीस वाहनांवरही दगडफेक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

शेंदुर्णीतील एका व्यायामशाळेत बुधवारी रात्री युवकांमध्ये बाचाबाची झाली. याचे रूपांतर दोन गटातील हाणामारीत झाले. एकमेकांवर दगड व विटा फेकण्यात आल्या. काही तरुणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन दुचाकींची तोडफोड केली. पोलिस पथक काही क्षणातच या भागात दाखल झाले. यावेळी पोलिस वाहनावर दगडफेक करण्यात आली. यात एका पोलिसासह दोन्ही गटातील पाच ते सहाजण जखमी झाले आहेत.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक भरत दाते, गणेश सुस्ते आदींनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पाचोरा येथील पोलिस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे हेदेखील घटनास्थळी पोहोचले. खबरदारी म्हणून चाळीसगाव, पाचोरा, पिंपळगाव हरेश्वर, जामनेर, जळगाव येथून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, रात्री ११:३० वाजता पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शेंदुर्णीत घटनास्थळाची पाहणी केली. ऐन सणासुदीच्या काळात शांतता भंग झाल्याने त्याचा परिणाम आगामी काळात होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. घटनेचे गांर्भीय लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि स्थानिक पोलिसांना बंदोबस्ताबाबत सूचना केल्या.

शेंदुर्णीत दोन गटामध्ये भांडणात २५ जणावर गुन्हा दाखल.

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे किरकोळ वादावरून दोन गटांमध्ये बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तुफान दगडफेक झाल्याने गावात तणावाचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी दंगलीचा गुन्हा नोंदवून संशयित आरोपींविरुद्ध धडक कारवाईस सुरुवात केली आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील दोन ते तीन युवकांचा जिममध्ये किरकोळ वाद झाला. यामध्ये दोघ गटातील लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी वेळीच कार्यवाही केल्याने मोठा अनर्थ टळला. दंगलीचे वृत्त वाऱ्यासारखे गावात पसरल्याने गावातील नागरिकांनी पटापट दुकानात बंद केले. यामध्ये परिसरातील वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोलिसांनीच फिर्याद दिल्यावरुन दोन्ही गटाकडील २५ संशयितांवर दंगल आणि पोलिसांवर प्राणघातक हल्ला व शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

Related Articles

Back to top button