कर्तव्यावर असलेल्या पंचायत समिती कर्मचाऱ्याला हृदय विकाराचा झटका, प्रकृती गंभीर.

सोयगाव दि. ०५ (प्रतिनिधी) सोयगाव पंचायत समितीचे कार्यालयीन अधिक्षक आनंद पैठणे यांना कामकाज करतांना अचानक छातीत कळा येऊन दुखू लागल्या मुळे हृदय विकारांचा झटका आल्याची घटना गुरुवारी साडे बारा वाजता घडली. दरम्यान पंचायत समितीचे कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सोयगाव पंचायत समितीचे कार्यालयीन अधिक्षक आनंद पैठणे (वय ५२) हे पंचायत समितीत कामकाज करतांना त्यांचेवर कामाचा ताण वाढल्या मुळे त्यांच्या छातीत दुखणे सुरू होऊन त्यांना हृदय विकाराचा झटका आला. तातडीने त्यांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीने उपचारासाठी जळगाव येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे खासगी वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाराव आहेर हे कर्मचार्यांना अर्वाच्य भाषेत बोलून अपमानास्पद वागणूक देत असल्याची चर्चा पंचायत समिती कर्मचाऱ्यांमध्ये रंगली होती.



