राजकीय
पहिल्या अडीच वर्षात सोयगावचे रस्ते गुळगुळीत होतील;- विकासाचे पाहिले नारळ बनोटीतुन – आमदार संजना जाधव
कन्नड - सोयगाव ला मंत्री पद मिळण्याची शक्यता..

सोयगाव दि. ०२ (प्रतिनिधी) सोयगाव च्या विकासा साठी केंद्र आणि राज्याच्या निधीतून सोयगाव, बनोटीचे रस्ते पहिल्या अडीच वर्षांत गुळगुळीत करून सोयगावला पश्चिम महाराष्ट्रातील तालुका बनविण्याचे स्वप्न आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला रस्त्या साठी भरघोस निधीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता सोयगाव तालुका आगामी काळात पश्चिम महाराष्ट्र सारखा दिसेल अशी ग्वाही सोमवारी नवनिर्माण आमदार संजना जाधव यांनी नागरी सत्कारात बनोटी येथे दिली आहे
बनोटी परिसरातील नागरिकांच्या वतीने कन्नड-सोयगाव च्या नवनिर्वाचित आमदार संजना जाधव यांचा सोमवारी सायंकाळी पाच वाजता बनोटी येथे नागरी सत्कार करण्यात आला यावेळी नितीन बोरसे, निलेश मगर,दिनेश जाधव,तात्याराव वाडेकर, बनोटीचे सरपंच मुरलीधर पाटील,भूषण वेहेळे, दीपक सपकाळ, सुनील जाधव यांच्या वतीने बनोटि ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी सांगितले की राज्यातील सर्व आमदार हे मुंबईत आहे परंतु मला मंत्री पदाची अपेक्षा नसल्याने मी मतदार संघात आहे मी हात दाखवा गाडी थांबवा अशी आमदार आहे आगामी काळात विकास करेल आपल्या साठी शिंदे गट शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षाचे निधी साठी दरवाजे उघडे आहे त्यामुळे हिवाळी अधिवेशनात मी सोयगाव च्या प्रमुख रस्त्याच्या विषय मांडून निधी खेचून आणेल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनानंतर सोयगाव साठी आठवड्यातुन एक दिवस देऊन बनोटी ला येईल व तहसील, पंचायत समितीच्या कामांचा निपटारा करण्याचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जयेश बोरसे, वाडीच्या सरपंच वैशाली बोरसे, देविदास राठोड भाजप तालुकाध्यक्ष सुनिल जाधव, माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, दिलीप पाटील, साईदास पवार, दादाभाऊ चव्हाण, तात्याराव वाडेकर, कल्पना जाधव, उषाबाई बागुल, जागृती सोळुंके, सुनिता सपकाळ, कृष्णा धुमाळ, प्रमोद पाटील, गणेश पालकर, दिनेश जाधव, पोपट धुमाळ, नाना साबळे, आदींची उपस्थिती होती.
मुंबई हुन कोणत्याही क्षणी फोन येईल …
मी मतदार संघात मतदारांची गाठीभेटी घेत आहे. मला मुंबईहून कोणत्याही क्षणी फोन येऊ शकतो असे सांगून त्यांनी कन्नड – सोयगाव ला मंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.


