महाराष्ट्र

शाखाप्रमुख गणेश कापरे यांनी उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदर यांचा वाढदिवस केला अनोख्या पध्दतीने साजरा….

सोयगाव दि. १७ (वृत्तसेवा) शिवसेनेचे (उबाठा) उपजिल्हाप्रमुख तथा सिल्लोड – सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार विठ्ठल बदर पाटील यांचा दि. १५ ऑगस्ट गुरुवार रोजी अंजनाई गोशाळेत शिवसेना आमखेडा शाखा प्रमुख (उबाठा) गणेश कापरे यांनी विठ्ठल बदर पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केल्याने तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
      याबाबत सविस्तर माहिती अशी, दि. १५ ऑगस्ट हा शिवसेनेचे (उबाठा) उपजिल्हाप्रमुख तथा सिल्लोड – सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून चर्चिले जात असलेले विठ्ठल बदर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमखेडा गावचे शिवसेनेचे (उबाठा) शाखा प्रमुख गणेश कापरे यांनी क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा संचलित अंजनाई गो शाळेतील गो मातांना दोन क्विंटल केळी खाऊ घालून अशा अनोख्या पद्धतीने विठ्ठल बदर पाटील यांचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान गणेश कापरे यांच्याहस्ते प्रथम गो मातेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर संपूर्ण गो मातेंना केळी खाऊ घालण्यात आली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप मचे, बबन रोकडे, क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, सचिव दिलीप शिंदे, संचालक, अशोक ढगे, ज्ञानेश्वर गाडेकर,अनिल लोखंडे, बापु ढाकरे, भागवत दनके, इलामसिंग आदी उपस्थित होते. यावेळी अंजनाई गोशाळा तर्फे गणेश कापरे यांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button