बांगलादेशात हिंदुवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शहरात मूक मोर्चा, तालुक्यात कडकडीत बंद…
‘बंद’ च्या आवाहनाला प्रतिसाद देत कडकडीत बंद... सोयगाव येथे सकल हिंदूत्ववादी संघटनेतर्फे तहसिलदारांना निवेदन.

दुकाने बंद ठेवून व्यावसायिकांनी बंदला दिले समर्थन, शेतकऱ्यांसह सर्वांचे व्यवहार ठप्प..
सोयगाव दि. १७ (वृत्तसेवा) बांगलादेशात अल्पसंख्यांक समाज बांधवांवर खास करून हिंदू बांधवांवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ दि. १७ शनिवार रोजी सोयगाव तालुक्यासह शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सोयगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना बाजार चौक मार्गे भवानी मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग शांततेत मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ह. भ. प. सुधन्वा महाराज केनेकर, ह.भ.प. निवृत्ती महाराज मोहने व ह. भ. प. कनैय्या महाराज यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच बंद मध्ये शहरासह तालुक्यातील व्यापारी वर्ग, सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून बंद शांततेत आणि कडकडीत पाळण्यात आला.
यावेळी सकल हिंदू समाजाच्यावतीने ह. भ. प. कन्हैय्या महाराज परदेशी, ह. भ. प. जान्हवी ताई सोनवणे, ह. भ. प. सुधनवा केनेकर, ह. भ. प. रवींद्र परेराव, ह. भ. प. निवृत्ती मोहने, सुनिल गव्हांडे यांच्या हस्ते तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना बंदचे निवेदन देण्यात आले. यावेळी सुनिल गंव्हाडे, दिपक सोनवणे, भारत हिरे, सचिन चौधरी, निलेश नागपुरे, आकाश जाधव, अजय मंडवे, संजय मोरे, कैलास काळे, कृष्णा (भैय्या) जुनघरे, सुनिल मिरकर, राहुल राठोड, सुनिल ठोंबरे, संदीप चौधरी यासह निवेदन देताना सकल हिंदू समाज संघटनेचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहरासह बनोटी, जरंडी, वरठाण, घोसला आदिंसह गावात बंद शांततेत यशस्वी झाला. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर झालेल्या अत्याचाराचा संपूर्ण हिंदू समाजाकडून तिव्र निषेध व्यक्त केला जात आहे. बांगलादेशातील सकल हिंदू समाज व अल्पसंख्यांकांना भारत सरकारने सुरक्षा पुरवावी, अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संपूर्ण देशातील हिंदू समाजाकडून केली जात आहे.
यामुळे देशातील सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी ‘भारत बंद’ चा मार्ग अवलंबला आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण देशात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याच विषयाला अनुसरून सकल हिंदू समाज व हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सोयगाव शहरासह तालुका बंदचे आवाहन केले होते. बंदला व्यापारी वर्गासह, सर्वसामान्य जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांनी घटनेच्या निषेधार्थ शांततेत कडकडीत बंद पाळला. यावेळी बंद शांततेत व कडकडीत बंद करण्यात तालुक्यातील युवकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदविला.
निवेदन तहसील कार्यालय कढून अव्वल कारकून व लिपिक उपस्थित…

तहसील कार्यालयात तहसीलदार व तीन नायब तहसीलदार असून त्यापैकी एक हि मुख्यालई राहत नसल्याने अखेर महसूल प्रशानाने अव्वल कारकून व लिपिक यांना निवेदन स्विकारण्यासाठी पाठविले. तालुक्यात कडकडीत बंद असतांना देखील महसूल प्रशासनाचे अधिकारी गैरहजर असल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी सकल हिंदू समाज संघटनेचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सह मोठ्या संख्येच्या उपस्थितीत तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून दयानंद जिरगे, लिपिक निवृत्ती कापसीकर, शिपाई संतोष नवगिरे, संतोष सोनवणे यांनी निवेदन स्विकारले.



