शेती

सोयगावच्या आठवडी बाजारात गवार १२० रुपये किलो, लिंबू ४० रुपये डझन.

सोयगाव दि. १९ (वृत्तसेवा) उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भाजीपाल्याच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. विशेषतः यात मंगळवारी (ता.१८) सोयगावच्या आठवडे बाजारात गवारच्या भाजीचा दर १२० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना कडधान्यांना अधिक पसंती द्यावी लागत आहे.ग्रामीण भागात उन्हाळ्यात गवार मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. त्यामुळे या दरवाढीचा थेट परिणाम घरगुती बजेटवर होत आहे. लसणाच्या किमतीत १० रुपयांची घसरण झाल्याने घरगुती स्वयंपाकाच्या खर्चात काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, गवारच्या दरवाढीमुळे महिलांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. तसेच लिंबू ४० रुपये डझन झाल्यामुळे लिंबाचे सरबतही महागणार आहे.

लसूण दरात घसरण.

लसणाच्या किमतीत १० रुपयांची घसरण झाल्याने घरगुती स्वयंपाकाच्या खर्चात काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, गवारच्या दरवाढीमुळे महिलांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. तसेच लिंबू ४० रुपये डझन झाल्यामुळे लिंबू सरबतही महागणार आहे.

Related Articles

Back to top button