क्राईममहाराष्ट्र

जरंडी, निंबायती परिसरातून सर्रास वाळुचा उपसा,  महसूल, व पोलिसांचे अभय.

महसुल पथक कागदांवरच.

सोयगाव दि. ०९ (वृत्तसेवा)) तालुक्यातील जरंडी परिसरातील धिंगापूर धरण, सुकी नदी, पाझर तलाव, लहान – मोठे नाले आदी ठिकाणावरून वाळूची बेकायदेशीर उपसा करून जरंडी, निंबायती, माळेगाव – पिंप्री, कंकराळा परिसरात वाहतूक सुरू आहे. दिवसा ढवळ्या हा प्रकार सुरू असून महसूल आणि पोलिसांचे अभय असल्याचे बोलले जात आहे. मात्र या विना परवानगी वाळू उपसा मुळे धरणे, पाझर तलाव आणि नद्यांच्या प्रवाह बदलले आहे. या बाबत महसूल विभागाला भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली तरी कारवाई होत नाही. कारण महसूल कडून याकडे अर्थपुर्ण हिंतसबधातुन दुर्लक्ष होत आहे.
बनोटी रस्त्या लगत असलेल्या सुकी नदी, पात्रात सर्रासपणे वाळू साठे जमा करून ही वाळू भर दिवसा ट्रॅक्टरच्या साहाय्याने विक्रीसाठी वाहून घेतले जात आहे. तसेच धिंगापूर धरण परिसरात या अवैध वाळू वाहतूक दारांनी बेकायदेशीर वाळू उपसा केंद्र सुरू केले आहे. दरम्यान धरणाच्या पात्रातून सर्रास वाळू चा उपसा सुरू आहे. अजिंठा डोंगर रांगेतील गंगा धार परिसर, सुकी नदी पात्र, निंबायती हद्दीतील नाले, पाझर तलाव आदी भागातून दिवसातून शेकडो ब्रास वाळूचा सर्रासपणे उपसा सुरू आहे. महसूल अधिकारी व पोलिसांचे मात्र या अवैध वाळू वाहतूक दारांशी लागेबांधे असल्याचे बोलले जात आहे. महसूल विभागाने याकडे आर्थिक हिंतसबध जोपासत दुर्लक्ष केले आहे. यामुळे या वाळू वाहतूक दारांचे फावले आहे. दरम्यान शनिवार, रविवारी तब्बल शेकडो ब्रास वाळूचा उपसा झाला आहे. महसूल विभागाला गुप्त माहिती देऊनही महसूल विभागाचे कारणे सांगत घटनास्थळी आले नव्हते. यावरून वाळू वाहतूक दारांशी महसुल व पोलिसांचे सूत जुळले असल्याची चर्चा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे.

जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार तहसीलदार मनिषा मेने जोगदंड यांनी स्थानिक महसूल पथक नियुक्त केले असले तरी ते कागदांवरच आहे. त्यामुळे पोलीसांचे चांग भले होत आहे. शनिवार, रविवार महसूल चे तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, व तहसीलदार हे १३० कि. मी. अंतरावर जिल्ह्याला राहत असल्याने वाळू माफिया, व पोलीस प्रशासनाला याचा फायदा होत आहे. या संदर्भात तलाठी यांना सांगितले तर आम्ही बघतो, असे सांगतात व नंतर मोबाईल पण कव्हरच क्षेत्राच्या बाहेर जातो. भरलेले ट्रॅक्टर किंवा डंफर खाली होऊन गेले की पुन्हा मोबाईल चालु होतो. त्यामुळे अधिकारीच वाळु माफियाना मुक संमती देत असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.

Related Articles

Back to top button