आपला जिल्हाक्राईम

अवैध वृक्षांची तोड करून लाकडे वाहणारे ट्रॅक्टर पकडले..

सोयगाव वनविभागाची धाडसी कारवाई.

सोयगाव दि. ०१ (वृत्तसेवा) तालुक्यातील धिंगापूर ते जरंडी रस्त्यावर बेहडा प्रजातीचे अवैध लाकडे वाहतूक करीत असताना ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. २० सी. आर. ३३९१ हे दि. २९ बुधवार रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास वनविभागाचे पथकाने सापळा रचून पकडले तात्काळ वन कर्मचारी यांनी सदरचे ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. या ट्रॅक्टर मध्ये बेहडा प्रजातीचे वृक्षांची डेरेदार लाकडे भरलेली होती. जरंडी परिसरात वृक्ष तोड करून हे ट्रॅक्टर द्वारे लाकडे चोरट्या  मार्गाने वाहून घेऊन जात असताना वनविभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे जरंडी सह सोयगाव, बनोटी परिसरातील अवैध वृक्ष तोड व्यापाऱ्यांचे धाबे दनांनले आहे सदर कार्यवाही मुख्य वनसंरक्षक  प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक श्रीमती. सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक एस. आर. भामरे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव अनिल मिसाळ यांचे मार्गदर्शनात वनपाल सोयगाव पी. डी. कोळी, वनरक्षक व्ही .आर. नागरे, व वनरक्षक एस. टी. चेके यांनी कारवाई केली. पुढील तपास वनपरीक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी. डी. कोळी हे करीत आहेत.

वनविभागाच्या कारवाईत पोलीसांची मदत.

जरंडी शिवारात वनविभागाने कारवाई धाडसी कारवाई केली या दरम्यान लाकूड तस्करांनी रात्रीचा फायदा घेत पलायन करु नये या करीता वनविभागाने पोलीस प्रशासनाची मदत घेऊन लाकूडाने भरलेले ट्रॅक्टर पोलीस ठाणे सोयगाव येथे जमा केले त्यानंतर दुसऱ्या दिवशी वनविभागाने ट्रॅक्टर ताब्यात घेऊन वनविभागाने जप्त केले आहे.

Related Articles

Back to top button