गरिबांना ५०० रुपयात गॅस सिलेंडर ; डॉ. हुलगेश चलवादींचा वादा.
युवकांच्या उज्वल भविष्यासाठी मोफत लॅपटॉप देणार.

डॉ. चलवादीच्या या १० ‘गॅरंटी’ची चर्चा त्यामुळे मतदार संघात विशेष लक्षणीय ठरत आहे. वाढती महागाईसोबतच आरोग्यसुविधावरील खर्चही वाढला आहे. अशात सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी ५ लाखांचा मोफत आरोग्य विमा देण्याची घोषणा डॉ.चलवादींनी केली आहे.दरवर्षी यात वाढत्या महागाईनूसार वाढ केली जाईल. यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी एक लाख झाडे लावण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
मातृशक्तीच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २ लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, नागरिकांना २४ तास मोफत पाणी मिळवून देण्याची हमी देखील डॉ. चलवादी प्रचार अभियानादरम्यान देत आहेत. मतदार संघात असलेल्या विविध समाजांना त्यांच्या सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी बहुद्देशिय सभागृह उभारून ‘विचारपीठ’ उपलब्ध करवून देण्याची डॉ.चलवादींची हमी देखील विशेष चर्चेची बाब ठरत आहे.


