आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

रक्ताचा तुडवडा भासू लागल्याने, आज सोयगाव येथे भव्य रक्तदान शिबीर….

सोयगाव दि. १० (वृत्तसेवा) रक्तपेढी मध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुडवडा भासू लागल्याने क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने दि. ११ सोमवारी सकाळी नऊ ते दोन या कालावधीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन संस्था व संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

      याबाबत सविस्तर माहिती अशी, दीपावलीचा उत्साह व विधानसभेच्या लागलेल्या निवडणुकीमुळे रक्तदान करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शहरातील रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासू लागला आहे.त्यामुळे समाजशील घटकांनी पुढे येऊन रक्तदान करावे व आपली सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन रक्तपेढीच्या वतीने करण्यात आल्याने  क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना सोयगाव पुढे सरसावल्या असून दि. ११ सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सोयगाव बसस्थानक मागे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रक्तदान हे श्रेष्ठदान असून  रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button