आपला जिल्हा

तीन वर्षानंतर बनोटी गावात बस सेवा सुरु…. प्रवाशांनी केले चालक व वाहकाचे स्वागत….

सोयगाव दि. १९ (वृत्तसेवा) तीन वर्षांपासून बनोटी गावात बस येत नसल्याने प्रवाशांना पायपीट करीत बनोटी गावाबाहेर यावे लागत होते. दरम्यान वाहतूक निरीक्षक अशोक काकडे यांनी दि. १९ शनिवार रोजी सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील बसस्थानकाची पहाणी करून गावात बस जावी यासाठी हिरवा कंदिल दिल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

     याबाबत सविस्तर माहिती अशी, गेल्या तीन वर्षांपूर्वी हिवरा नदीला आलेल्या महापुरामुळे पुलासह एस. टी. बसस्थानक वाहून गेल्याने परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बनोटी गावात न येता बनोटी गावा बाहेरून जात असल्याने महिला, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण व वयोवृद्धांना बसगाडीने प्रवास करण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर पायपीट करीत गावाबाहेर यावे लागत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी बनोटी ग्रामपंचायतीने शासकीय अनुदानाची वाट न बघता बसस्थानकाचे काम हाती घेऊन पूर्ण केले. ग्रामपंचायत ने बसगाड्या बनोटी गावात पूर्वरत सुरू करण्याचा ठराव घेऊन सोयगाव, सिल्लोड, पाचोरा आगारास बसगाड्या गावात येण्यास सुरू करण्याची मागणी केल्यावर सोयगाव आगाराचे वाहतूक निरीक्षक अशोक काकडे यांनी शनिवारी बनोटी बसस्थानकाची पहाणी करीत बसेस पुर्वरत सुरू करण्याचे सांगितल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत आगार प्रमुख, चालक मनोज चव्हाण, वाहक रवि सोनवणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी उपसरपंच उदय खैरनार, वामन जाधव, निळकंठ खैरनार, साहेबराव वेहळे, संतोष खैरनार, नामदेव चव्हाण, छोटूराम पाटील, योगेश निकम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button