महाराष्ट्र
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी मध्ये जाणाऱ्या बस मधून बकरीसाठी लागणाऱ्या झाडांच्या पाल्याची वाहतूक…
सोयगाव बस आगाराचा अजब कारभार,

सोयगाव दि. २४ (वृत्तसेवा) राज्य परिवहन महामंडळाच्या सोयगाव आगाराची अजिंठा लेणी मध्ये जाणारी बस क्रमांक एम. एच. १४ बी. टी. २१८२ या बस मधून बकरी साठी चारा म्हणून लागणाऱ्या झाडांचा पाल्याची वाहतूक झाल्याचा धक्कादायक प्रकार दि. २४ गुरुवार रोजी सकाळी उघडकीस आल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी, जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेणीमध्ये पर्यटकांची वाहतूक करण्यासाठी सोयगाव आगाराच्या बसगाड्या सेवा देतात. या बसगाड्या सोयगाव आगारातून सकाळी अजिंठा लेणीकडे जाण्यास निघतात. या बसगाड्यांमध्ये फर्दापुर पर्यंत जाण्यासाठी प्रवाशी घेतले जात नाही. यामुळे प्रवाशांना फर्दापुर येथे जाण्यासाठी एक ते दीड तास वाट पहावी लागते. याकडे मात्र आगार प्रमुख दुर्लक्ष करीत असल्याचे प्रवाशांमधून बोलले जात आहे. अजिंठा लेणी कडे जाणारी बस क्रमांक एम. एच. १४ बी. टी. २१८२ या राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून बकरी साठी चारा म्हणून लागणाऱ्या झाडांचा पाल्याची वाहतूक करण्यात आली. त्यामुळे झाडांचा पाला बस मध्येच पडला त्यामुळे जागतिक दर्जाच्या अजिंठा लेणी मध्ये सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्याच्या या अनागोंदी कारभारामुळे पर्यटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी काय कार्यवाही करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.