महाराष्ट्र

सत्ताधारी पक्षाचे फलक, कोनशिला उघड्यावरच, स्थानिक कर्मचाऱ्यांची आचारसंहिता पथकप्रमुखांकडून पाठराखण.

 आचार संहितेचे तीन तेरा -

सोयगाव दि. २५ (वृत्तसेवा) सिल्लोड – सोयगाव मतदारसंघाचा भाग असलेल्या सोयगाव तालुक्यातील फर्दापुर तांडा, वरखेडी बु: व फर्दापुर येथे सत्ताधारी पक्षाचे महिला आघाडीचे फलक, विद्युत खांबावरील फलक, शाळेच्या खोलीवरील कोनशिला उघड्यावरच असल्याचा धक्कादायक प्रकार दि. २५ शुक्रवारी उघडकीस आल्याने आदर्श आचारसंहितेचे तालुक्यात तीनतेरा वाजले आहे. सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात लोकशाही जिवंत आहे का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. तर आचारसंहिता पथकाकडून आचारसंहिता भंग करणारे व कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकांवर कार्यवाही करीत नसल्याने एकप्रकारे सत्ताधारी पक्षाचे काम शासकीय यंत्रणा तर करीत नाहीना अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दि. १५ ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागली असताना देखील सोयगाव तालुक्यात अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे फलक, चिन्ह, कोनशिला उघड्यावरच आहेत. निवडणूक आयोगाच्या ऍप वर तक्रार केल्यानंतर संबंधित यंत्रणेला ऍप वरील छायाचित्र पाठवून उघड्यावर असलेले फलक, कोन शिला झाकण्या विषयी सूचना केली जात आहे. मात्र कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आचारसंहिता पथक प्रमुखांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. लोकशाहीची अंमलबजावणी करणारी शासकीय अधिकारी, कर्मचारी जणू राजकीय पक्षाच्या दावणीला बांधल्या गेल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.  सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात लोकशाही नाही तर ठोकशाही सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगासह केंद्रीय निवडणूक आयोगा कडे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी चंद्रास आप्पा रोकडे व संदीप इंगळे करणार असल्याचे त्यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

Related Articles

Back to top button