भरधाव टेम्पोने एकाला उडविले; दुचाकीस्वार जागीच ठार-नांदगाव तांड्या जवळील घटना…
सोयगाव दि. १७ (वृत्तसेवा) भरधाव टेम्पोने सामोरा – समोर दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवार रोजी दुपारी तीन वाजता सोयगाव – बनोटी रस्त्यावर नांदगाव तांडा गावाजवळ घडली या घटनेत दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला पडून डोळा धडा वेगळा होऊन रस्त्यावर पडलाचा थरार अपघातात घडला आहे.
सदर अपघातात काशिनाथ भाऊराव बाविस्कर (वय ३८) रा. तिडका ता. सोयगाव ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळी या तरुणांचा डोळा धडा वेगळा होऊन रस्त्यावर पडला होता..
सिल्लोडकडून पाचोरा कडे जाणाऱ्या टेम्पोने क्र. – एम. एच. ०५ बी. डी. ०३३५ हा मका भरून पाचोराकडे जात असताना सातगाव ता. पाचोरा कडून तिडका कडे जात असलेल्या दुचाकी क्र. एम. एच. १९ बी. आर. १६१३ (प्लॅटिना) दुचाकीस्वारला भरधाव टेम्पोने समोरून धडक देऊन उडविले घटनास्थळवरून टेम्पो चालक फरारी झाला आहे. या घटनेमुळे नांदगाव तांडा तिडका परिसरात हळहळ व्यक्त झाली होती. दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृत काशिनाथ बाविस्कर यास ग्रामस्थांनी तातडीने रुग्णवाहिका मध्ये उपचारासाठी पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. असता त्यास मृत घोषित करण्यात आले. दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक पंकज बारवाल रवींद्र तायडे आदींनी घटनास्थळी पंचनामा करून चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून टेम्पो क्र. एम. एच. ०५ बी. डी. ०३३५ सोयगाव पोलीस ठाण्यात जमा केले आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतिष बडे, रवींद्र तायडे, राजू बर्डे, अजय कोळी आदी करत आहे.



