आपला जिल्हामहाराष्ट्र

तिडका येथे विषबाधा होऊन अकरा जनावरे दगावली,

हौदातील पाणी पिल्याने झाली विषबाधा.

सोयगाव दि. १९ (प्रतिनिधी संदीप इंगळे) तालुक्यातील तिडका येथे हौदातील पाणी पिल्याने विषबाधा होऊन जवळपास एकवीस जनावरे अत्यवस्थ झाली. याची माहिती पशुपालकांनी सोयगाव, बनोटी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. घटनेचे गांभीर्य पाहून सोयगाव, बनोटी येथील पशुवैद्यकीय पथकाने तिडका गाठत तात्काळ जनावरांवर उपचार करण्यास सुरुवात केली. यात उपचारा दरम्यान दहा जनावरांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोयगाव तालुक्यातील तिडका येथे दि. १९ मंगळवारी घडली. यामुळे तालुक्यातील पशुपालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सोयगाव, बनोटी येथील पशुसंवर्धन पथक तिडका येथे तळ ठोकून जनावरांवर उपचार करीत आहेत.

    सोयगाव तालुक्यातील तिडका शिवारातील संदिप मगर यांच्या मालकीच्या गट क्रमांक ५५ मधील शेतात संदिप मगर, विष्णू मगर, मुबारक पटेल, जगदिश मगर यांचे असे एकवीस जनावरे सकाळी चारण्यासाठी सोडली होती. जनावरे चरून झाल्यावर गुरांना पाणी पिण्यासाठी केलेल्या हौदात जनावरे पाणी पिले, पाणी पिल्यानंतर जनावरांची पाय हलके पडुन एक – एक करीत जमिनीवर पडली घाबरलेल्या शेतकऱ्याने गावात माहीती देताच गावातील पशुपालक गोळा होऊन सोयगाव आणि बनोटी पशुवैद्यकीय अधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे माहीती दिली. माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिडका गाठले आणि तात्काळ जनावरांवर उपचार सुरू केले. उपचार सुरू असतांना संदिप मगर, विष्णू मगर व मुबारक पटेल यांचे असे एकुण दहा जनावरांचा मृत्यू झाला. यात म्हैस,  म्हशीचे पारडु,  तीन बैल, गायी आणि दोन वासरु असे दहा जनावरे दगावली आहेत. दोन जनावरांची प्रकृती चिंताजनक असून उर्वरित जनावरांची तब्येत स्थिर असल्याचे पशु वैद्यकीय अधिकारी दानिश बुखारी यांनी सांगितले. दरम्यान दहा जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा पुणे येथील डी. आय. एस. प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी दानिश बुखारी, व्ही. एच. कांबळे, १९६२ रुग्णवाहिका चालक डॉ. निलेश पाटील, मंगेश काळे, अदिनाथ साबळे, खाजगी डॉ. अरुण महाजन, मोहीत जाधव यांच्या पथकाने जीवाची पराकाष्ठा करीत अकरा जनावरे वाचविण्यात यश आले आहे. शेतातील हौदातील जनावरांनी पाणी पिल्याने विषबाधा झाली असुन नेमकी ही विषबाधा कशामुळे झाली याबाबतचे कारण मात्र समजू शकले नाही.

Related Articles

Back to top button