महाराष्ट्र

आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या देशी गायीच्या शेणाच्या टॅबलेट व चूर्ण सर्व रोगावर गुणकारी, – कैलासबापू देशमुख यांचे मत.

सोयगाव दि. १२ (प्रतिनिधी) आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या गायीच्या शेणाच्या चक्क टॅबलेट व चूर्ण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे देशी गायीच्या शेणाला विशेष महत्व प्राप्त झाले असून सर्व व्याधींवर गुणकारी म्हणून गायीच्या शेणकडे पाहिले जाते असे प्रतिपादन कैलासबापू देशमुख यांनी मंगळवारी सोयगाव येथे अंजनाई गोशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मत व्यक्त केले.
क्रांती जनहित संस्थेच्या अंजनाई गोशाळेचा दि. १२ मंगळवार रोजी वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी गोशाळेतील ५६ गोवंशाचे वाढदिवस अनोख्या पद्धतीने संस्थेच्या वतीनं साजरा करण्यात आला होता. अध्यक्ष स्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख, कृष्णाई गोशाळेचे संस्थापक सचिव सचिन आगे, सचिव शिक्षक सेनेचे विठ्ठल बदर, ह. भ. प. सुधन्वा केनेकर महाराज, गो – सेवा जिल्हा संघटक लोकेश पाटील, रघुनाथ चव्हाण, सुभाष वाडेकर, किशोर झवर, डॉ. नाना पायघन, डॉ. अजय वाडेकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी  गो – माते बद्दल मनोगत व्यक्त केली. प्रास्ताविकात संदीप इंगळे यांनी सांगितले की गोशाळेच्या स्थापने च्या सुरवातीला फक्त तीनच गोवंश गोशाळेत होते त्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत ५६ वर गोवंश दाखल झाले आहे. एका वर्षाच्या कालावधीत सर्व माझ्या सहकाऱ्यांनी यशस्वी केले आहे. व अनेकांनी योगदान, श्रमदान केले त्यामुळे हे सर्व शक्य होत आहे. तसेच कृष्णाई गो – शाळेचे सचिव सचिन आगे यांनी गोवंशाची काळजी बाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येकांच्या दारी एक तरी गाय असायला पाहिजे, किंवा शक्य नसेल तर एक गाय दत्तक घेऊन त्या साठी गो शाळेला योगदान करावे असे आवाहन सचिन आगे यांनी केले. तसेच लोकेश पाटील यांनी सध्याच्या काळात गाईच्या वंश शुद्धीकरण करणे गरजेचे आहे असे सांगितले. तर विठ्ठल बदर यांनी मी आपले मनोगत व्यक्त करतांना मी संस्थे साठी सदैव हजर राहून सहकार्य करेल त्यासोबत सर्वांनी देखील गोशाळेसाठी प्रयत्न करावे असे उपस्थिताना सागत गोवंश संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच ह.भ.प. सुधन्वा केनेकर यांनी देखील अतिशय मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले. दरम्यान आमखेडा येथील नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आलेले भगवान गाडेकर, शेणफडू पाटील व संतोष शेलकर यांचा क्रांती जनहित बहुउद्देशिय विकास संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव दिलीप शिंदे, सदस्य ज्ञानेश्वर गाडेकर, अशोक ढगे, अनिल लोखंडे, कोषाध्यक्ष सौ. उर्मिला इंगळे, सदस्या सौ. रुपाली लोखंडे,  सौ. मिनाबाई गाडेकर, सौ. पद्माबाई शिंदे यांच्यासह सुभाष गव्हाड, मयूर मनगटे, अमोल हिरे,  दिनेश पंडित, ज्ञानेश्वर आप्पा वाघ, मनोज देसाई, विलास बोर्डे, गजानन गव्हाड, गणेश खलसे, शांताराम तेलंग्रे, विनोद वामने, कडूबा गाडेकर, निलेश गाडेकर, राहुल परदेशी, मंगलाबाई गाडेकर, पल्लवी गाडेकर, रोहिणी गाडेकर, कार्तिकी गाडेकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल लोखंडे, अशोक ढगे, मुकेश बारेला, गजानन ढगे, विश्वनाथ कोथलकर, ईश्वर बडक, विनोद चौधरी यांच्यासह परिसरातील गो प्रेमींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दत्ता गाडेकर यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे मानले.

Related Articles

Back to top button