सोयगावच्या तहसील कार्यालयात कोणीही खुर्चीवर ताबा मिळवून करतात संगणकाचा वापर…
तहसील प्रशासन निद्रावस्थेत....

सोयगाव दि. ३० (वृत्तसेवा) सोयगाव तालुक्यात प्रशासनाचे अधिकारी हे निद्रावस्थेत गेल्याचा प्रत्यय दि. २८ बुधवार रोजी आला असुन अधिकारी व कर्मचारी यांच्या खुर्चीवर ताबा घेऊन शासकीय माहिती असलेल्या संगणक देखील हाताळला गेला. असुनही प्रशासन मात्र कारवाई करण्याची तसदी घेत नसल्याने अधिकारी यांच्यावर राजकीय दबाव असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, ना. अब्दुल सत्तारांच्या सोयगाव येथील नॅशनल मराठी शाळेत लिपीक पदावर नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्याने दि. २८ बुधवार रोजी चक्क सोयगाव तहसील कार्यालयातील निवडणूक विभागातील पेशकाराच्या खुर्चीचा ताबा घेत पेशकाराच्या खुर्चीवर बसून शासकीय माहिती असलेल्या संगनकावर डीएससी चा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता? सदरील व्यक्ती ने डीएससी चा वापर कशासाठी केला त्याला लॉगिंग करून देण्यास कुणी मदत केली? तो खुर्चीवर बसून बिनधास्त डीएससी चा वापर करीत असताना कार्यालयात उपस्थित तहसिल कर्मचाऱ्यांनी त्यास विचारणा का केली नाही? शिक्षण संस्थेत लिपीक पदावर असलेल्याने असे कृत्य करणे यामागे कुणाचा हात आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असतांना देखील तहसील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस उलटून देखील यावर चौकशी करुन कारवाई का केली नाही. तहसील प्रशासनावर नेमका कोणी दबाव टाकत तर नाही ना? अधिकाऱ्यांना कदाचित बदलीची भिती असल्याने कारवाई करण्याची हिंमत देखील करीत नाही. किंवा अधिकाऱ्यांनीच त्या व्यक्तीला खुर्चीवर बसून शासकीय माहिती असलेल्या संगणकावर डीएससी वापरुन हवे तसे कामे करण्याची परवानगी दिली असावी. या स्वरुपात तहसील कार्यालयाच्या परिसरात चर्चेला उधान आले आहे.
अधिकारी यांच्या काढून उडवाउडवीचे उत्तर… कारवाई करणार कोण?
या संदर्भात तहसीलदार मनीषा मेने यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, छत्रपती संभाजीनगर येथे ट्रेनिग असल्याने मी नाही त्यामुळे तुम्ही तहसील कार्यालय येथे पेशकार सोनवणे आहे. त्यांच्या कडून माहिती घ्या. त्यानंतर तहसील कार्यालय सोयगाव येथे आमचे प्रतिनिधी गेले असता कार्यालयात कोणतेही अधिकारी खुर्चीवर दिसून नाही आले. त्यांनतर तहसीलदार मॅडम यानी सांगीतल्या प्रमाणे पेशकार सोनवणे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, तो विषय निवडणूक विभाग व पुरवठा विभागाचा आहे. त्यात मी महसूल विभागात आहे त्यामुळे त्याचा व माझा काय एक संबध नाही. तसेच या संदर्भात निवडणूक विभागातील नायब तहसीलदार हेमंत तायडे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यानी सांगितले कि, “एक आगस्ट पासून मी जिल्हाधिकारी कार्यालयात एपीए च्या कामात व्यस्त आहे. मी चौकशी केली असता तो निवडणूक विभागातील संगणकावर पुरवठा विभागाचे काम करीत होता. त्यामुळे त्याचा निवडणूक विभागाशी काही संबध नाही. अशा स्वरुपाची उत्तरे अधिकारी वर्गातून दिली जात आहे.



