आपला जिल्हामहाराष्ट्र

वेदना शून्य नामदारांच्या हस्ते दिव्यांगाना साहित्य वाटपाचा शासनाचा घाट, साहित्य घेण्यासाठी दिव्यांगांची हेळसांड… 

सोयगाव दि. ३० (वृत्तसेवा) सहा महिन्यांपासून पंचायत समितीच्या बचत भुवन मध्ये पडून असलेल्या साहित्याचे दि. २९ गुरुवारी पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते दिव्यांगाना वाटप करण्यात आले. नियोजनाच्या अभावामुळे दिव्यांगांची मोठी हेळसांड झाल्याने दिव्यांगांनी संताप व्यक्त केला होता.

याबाबत सविस्तर माहिती अशी, भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे मागील वर्षी पंचायत समिती बचत भवन येथे भारत सरकार अंगीकृत अलिम्को (ऐडीफ) संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग बंधुची तपासणी करण्यात आली होती. गेल्या सहा महीण्यापासुन सदरील दिव्यांगांचे साहित्य पंचायत  समिती बचत भवन येथे धुळ खात पडुन होते. दिव्यांगांचे साहित्य आलेले असताना. केवळ राजकीय इर्षेने दिव्यांगाना साहित्य वाटप करण्यात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांग सशक्तीकरण विभागाच्या सामाजिक अधिकारिता शिबिराचे दि. २९ गुरुवारी पंचायत समिती कार्यालयासमोर आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तालुक्यातील २८७ लाभार्थी पैकी २४० दिव्यांग लाभार्थांना साहित्य वाटप करण्यात आले. दरम्यान सहा महिन्यांपासून पंचायत समितीच्या बचत भवन मध्ये दिव्यांगाना वाटप करण्यात येणारे साहित्य पडून होते. ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगाना साहित्य वाटप करण्यात आले. नियोजनाच्या अभावामुळे दिव्यांगाना मोठा त्रास सहन करावा लागला होता. पंचायत समिती विभागाकडून योग्य नियोजन न केल्यामुळे दिव्यांगाना स्वखर्चाने तालुक्याच्या ठिकाणी येऊन कार्यक्रम स्थळी रांगत जावे लागले होते. यामुळे शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला तर मिळालेले साहित्य नेण्यासाठी दिव्यांगाना सायकल भाडे पोटी प्रत्येकी चारशे ते पाचशे रुपये आर्थिक भुदंड देखील सोसावा लागल्याने दिव्यांगांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दिव्यांगाना घरपोच साहित्य पुरविण्यात येत नसल्याने शासनाकडूनच दिव्यांगांची हेळसांड झाली होती. त्यातच राजकीय व्यक्तीच्या अवघ्या विस ते पंचवीस मिनीटाच्या उपस्थिती साठी सहा ते सात महिने साहित्यापासुन दुर ठेवले जाते. तर व वाटपाच्या दिवशी गाजावाजा करीत  राजकीय पोळी भाजण्यासाठी दिव्यागांच्या भावनाशी खेळायचे यामुळे दिव्यागांना मनस्ताप होत असल्याचे दिसून येत होते. त्यातच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सांगत होते की आम्हीच हा कार्यक्रम घेत आहे. त्यामुळे पैसा शासनाचा व प्रचार राजकीय पक्षाचा अशी चर्चा उपस्थितांमध्ये चालु होती.

सोयगांव तालुक्यातील दिव्यांग बंधुची भारत सरकार अंगीकृत अलिम्को संस्थेद्वारे पात्र लाभार्थ्यांना ६ बॅटरीवर चालणारी सायकल, ६८ तीन चाकी सायकल, ३९ व्हीलचेअर, ८० जणांना श्रावण यंत्र, तर ४७ जणांना वॉकिंग स्टिक साहित्य वाटप पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. परंतु वाटप झालेले साहित्य हे बऱ्यापैकी नादुरुस्त होते. त्यामुळे दिव्यागांना साहित्य घरी कसे न्यायचे असा प्रश्न पडला होता.

पालकमंत्री यांच्याहस्ते साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी नसल्याने जिल्हा परिषद प्रशालेच्या विध्यार्थीना पाचारण करण्यात आले होते. लाभार्थी कमी व शासकीय कर्मचारी व शालेय विद्यार्थिनी व कार्यकर्त्यांचीच उपस्थिती होती….

Related Articles

Back to top button