आपला जिल्हा

आपल्या छत्रपती संभाजी नगर मध्ये बाल संस्कार शिबिराचे आयोजन.

छत्रपती संभाजीनगर दि. १४ (प्रतिनिधी जयराज चव्हाण) शहरामध्ये दि. १५  मे २०२४ वार बुधवार रोजी आध्यात्मिक वारकरी बाल संस्कार शिबिर याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी मुंल व मुली याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता तसेच ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना वारकरी सांप्रदयाचे शिक्षण द्यायचे असेल तर हर्सुल पोलीस स्टेशन शेजारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामवंत महाराजाची उपस्थिती रहाणार आहे. या १५ दिवसामध्ये मुलांना सकाळी ०४  ते ०६ काकडा, ०६ ते ०७ विष्णुसहस्त्र नाम, ०७ ते ०८ स्नान, ०८ ते ०९ गीतापाठ व हनुमान चालिसा पाठ, ०९ ते १० नाष्टा, १० ते १२ टाळ व मृदुंग पाठ, १२ ते ०१ जेवण, ०१ ते ०४ विश्रांती, ०४ ते ०५ गायन चाली, ०५ ते ०६ खेळ, ०६ ते ०७ हरिपाठ, ०७ ते ०९ जेवण, आपल्या हिंदू संस्कृतीतील तरुण वर्ग खूपच व्यसनाधीन होताना दिसत आहे. एकदा मुलांचे वय १८ वर्षाच्या वरती गेले की मुलांना अखंड हरिनामाची संगत लागता लागत नाही. त्यामुळे मुलांना लहान वयापासून त्यांच्या कानावरती पडलेले सामाजिक शब्द असो किंवा राजकीय शब्द असून व धार्मिक शब्द असो या किशोरवयीन मुलांमध्ये जे ऐकायला भेटले जे संस्कार किशोर वयामध्ये घडले तेच त्यांच्या पुढे उज्वल भविष्य घडवतात. एक मुलांनी जर या अध्यात्माचे शिक्षण घेतले तर तो भविष्यात काही तरुणांना सुधारू शकतो एवढे या ज्ञानामध्ये ताकद आहे. तरी सर्व आई – वडिलांना व विनंती आहे. की आपल्या मुलांना शाळेसोबतच धर्माचे हे थोडे ज्ञान मिळाले. तर त्यांच्या भविष्यासाठी चांगले होईल. ह. भ. प. मंगलताई ज्ञानेश्वर राऊत यांच्या सौजन्याने हा पंधरा दिवसाचा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नागरिकांनी भाग घ्यावा असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button