महाराष्ट्र

अतिक्रमण विरोधात मनपाची सातत्याने कारवाई.

चंद्रपूर दि. १४ (वृत्तसेवा) शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमणधारकांवर चंद्रपूर महानगरपालिका,पोलीस विभाग व वाहतुक पोलीस विभागाद्वारे संयुक्त कारवाई सुरूच असुन नागपुर रोडवरील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात हटविण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासुन नागपुर रोडवरील प्रियदर्शिनी चौक ते कुंदन प्लाझा यादरम्यान कारवाई करण्यात येत असुन यादरम्यान अंजीकर मोटर्स,शिवशंकर होंडा या दुचाकी वाहन विक्री करणाऱ्या शोरूम समोर रस्त्यावर ठेवलेल्या ट्रॉली जप्त करण्यात आल्या असुन क्रोमा, गायत्री मोटर्स व इतर काही दुकानांसमोरील बांधकाम केलेले रॅम्प तोडण्यात आले आहे. काही दुचाकी तसेच चारचाकी वाहनेही जप्त करण्यात आले असुन अनेक दुकानदारांचे फुटपाथवर ठेवण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे पत्र्याचे शेड लाऊन फुटपाथवर अतिक्रमण केले असल्याचे आढळुन आल्याने त्यांचे अतिक्रमण जेसीबीद्वारे काढण्यात आले. मागील काही दिवसांपासुन रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी स्वतः हुन अतिक्रमण काढण्याच्या सुचना मनपातर्फे ऑटोद्वारे सातत्याने देण्यात येत आहेत.मात्र त्याकडे दुर्लक्ष करून,कारवाईची तमा न बाळगता अतिक्रमण उभेच होते त्यामुळे मनपा,पोलीस विभाग व वाहतुक पोलीसांद्वारे कारवाई करण्यात आली आहे.
आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त व अतिक्रमण पथकाद्वारे सदर कारवाई करण्यात येत असुन पुन्हा फुटपाथ

Related Articles

Back to top button