आपला जिल्हामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाठ फिरावल्याने शिवप्रेमी नाराज…

दांडी बहाद्दर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार कोण?

सोयगाव दि. १९ (वृत्तसेवा) सोयगाव शहरासह तालुक्यात सर्वत्र शिवजयंती दि. १९ सोमवार रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषी विभाग, वनविभाग, नगर पंचायत, आदी शासकीय कार्यालयात बोटावर मोजण्या इतक्याच कर्मचाऱ्यांच्या उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. तर काही कार्यालये, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा, ग्रामपंचायती आदी ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली नसल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवप्रेमी मधून केली जात आहे. दरम्यान सोयगाव शहरातील मुख्य चौकासह ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील घराघरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली होती. त्यामुळे घराघरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह होता.

    सोयगाव तहसील कार्यालय येथे एक तहसीलदार, चार नायब तहसीलदार, आठ पेशकार, आठ महसूल सहाय्यक, पाच शिपाई यांच्या सह पाच कोतवाल असे एकूण ऐकतीस कर्मचारी कार्यरत आहे. त्यापैकी फक्त एक नायब तहसीलदार व दोन शिपाईच शिवजयंती साठी हजर होते तर नुकताच पदभार स्विकारलेल्या तहसीलदार यांच्या सह अधिकारी व कर्मचारी व कोतवाल अशा अठ्ठावीस जणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला दांडी मारल्याने तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. यावर जिल्हाधिकारी दांडी बहादर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात कि कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तहसील कार्यालय येथे शहरापासून दोन कि. मी. अंतरावर असलेल्या गलवाडा (अ) येथील रहिवासी असलेले नायब तहसीलदार विठ्ठल जाधव यांच्या उपस्थितीत मुख्य अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिपाई संतोष नवगिरे, अनिल पवार हे दोघेच उपस्थित होते. तसेच इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी देखील अपडाऊन करीत असल्याने तेही उपस्थित नव्हते. तालुक्यातील शासकीय कार्यालयातील गैरहजर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गैरहजर प्राथमिक शिक्षकांवर कारवाई करा :-

सोयगाव तालुक्यात छत्रपती संभाजीनगर येथून तब्बल वीस शाळांचे प्राथमिक शिक्षक अप डाऊन करतात परंतु या छत्रपती संभाजीनगर वरून अप डाऊन करणाऱ्या शिक्षकांनी सोमवारी शिवजयंती च्या सुट्टीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शाळेवर हजर झालेच नाही त्यामुळे ऐनवेळी स्थानिक शिक्षकांना छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्याची तयारी करावी लागली. दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथून अपडाऊन करणाऱ्या शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना सोमवारी अभिवादन करण्यासाठी गैरहजर असलेल्या शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button