आपला जिल्हामहाराष्ट्र
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

सोयगाव दि. १८ (वृत्तसेवा) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यावतीने ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे दि. २१ बुधवार रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजे पर्यंत महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वस्वरूप संप्रदाय यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे दि. २१ बुधवार रोजी सकाळी ०९ ते दुपारी ०३ या वेळात करण्यात आले आहे. तरी या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन सोयगाव तालुका आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



