आपला जिल्हा

पाणी पुरवठा पाईपलाईन फुटल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात…

तीन महिन्यापासून पाईप लाईन दुरुस्तीसाठी महुर्तू मिळेना...

सोयगाव दि. ०२ (वृत्तसेवा) आमखेडा छ. शिवाजी महाराज नगर परिसरात आमखेडा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांनी तीन महिण्यापासून फुटलेली पाईप लाईन दुरुस्तीच्या नावाने खडा खोदून ठेवला आहे. मात्र तीन महिण्यापासून खोदलेल्या खड्याची दुरुस्ती करण्याचा ग्रामसेवक यांना महुर्तू काही मिळाला नसल्याने नेमके नागरिकांच्या जीवाशी खेळ लावला असल्याचे दिसून येत आहे.
आमखेडा परिसरात अनेक ठिकाणी गटारी तुटुंब भरून वाहत आहेत. तर नाल्या सफाई होत नसल्याने त्यातून शेपटाचे किडे नागरिकांच्या घरात प्रवेश करीत आहे. या बाबत ग्रामसेवक कोणतेही दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे घरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना घरात थांबणे देखील कठिण झाले. त्यातच छ. शिवाजीनगर परिसरात पाईप लाईन दुरुस्तीच्या नावाने ग्रामसेवक यांनी तीन महिन्यापासून रस्त्याच्या मधोमध खडा खोदून ठेवला आहे. तीन महिन्यापासून कोणत्याही नेत्याने पाईप लाईन दुरुस्तीच्या कामाची उद्घाटन करण्याची तारीख दिली नसल्याने काम अद्याप पर्यंत पडून असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खोदलेल्या खड्यात दुर्गंधीयुक्त पाणी घेल्याने तेच पाणी पाणीपुरवठा करण्याऱ्या पाईप लाईन द्वारे नळाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या घरात पाण्यासाठी उपयोग केला जात असल्याने नागरिकांच्या आयोग्याची समस्या वाढण्याची शक्यता आहे.
खोदलेल्या खड्यामुळे रस्त्यात मोठ्याप्रमाणात चिखल होत आहे. त्यामुळे त्या चिखलात लहान मुले, वयोवृद्ध महिला – पुरुषांना चालण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मात्र या कडे ग्रामपंचायत का लक्ष देत नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. तरी तात्काळ या पाईप लाईन ची दुरुस्ती करून रस्त्यातील खडे बुजण्याची मागणी परिसरातून होत आहे.

Related Articles

Back to top button